• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • गाणं म्हणणे आणि विधानं करणे, यात रश्मी ठाकरे कधी पडल्या नाही, शिवसेनेचा भाजपला टोला

गाणं म्हणणे आणि विधानं करणे, यात रश्मी ठाकरे कधी पडल्या नाही, शिवसेनेचा भाजपला टोला

'किरीट सोमय्या यांनी सातत्यानं जे विषय काढले आहेत, ते जेवणातील लोणच्यासारखे आहेत. मुळात सोमय्या हे पाणचट आहेत, असं रवींद्र वायकर बोलले होते, ते खरंच आहे'

 • Share this:
  मुंबई, 12 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून (Anvay Naik suicide case) शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) शाब्दिक युद्ध पेटले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे नाईक कुटुंबांशी जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. तर 'रश्मी ठाकरे यांनी कधी गाणे म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधान करणे यात पडल्या नाही' असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांनी भाजपला जशास तसे उत्तर दिले. विधान परिषदेच्या उपसभापती आणि सेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सेनेवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना सणसणीत उत्तर दिले आहे. 'मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे. हाच सर्वात मोठा विनोद आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सरकार, विधिमंडळ कधीही पाठीशी घालणार नाही, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी भाजपचे नेते राम कदम यांना सणसणीत टोला लगावला आहे. बिहार काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता, तेजस्वी म्हणतात, आम्हीच सत्तेत येणार 'किरीट सोमय्या यांनी सातत्यानं जे विषय काढले आहेत, ते जेवणातील लोणच्यासारखे आहेत. त्यांनी आतापर्यंत जेवढे आरोप केले आहे, त्याचे एक पुस्तक होईल. त्यांनी न्यायालयात जरूर जावावे. मुळात किरीट सोमय्या हे पाणचट आहेत, असं रवींद्र वायकर बोलले होते, ते खरंच आहे', अशा शब्दात निलम गोऱ्हे यांनी सोमय्यांची खिल्ली उडवली. 'ठाकरे कुटुंबावर जे काही जमीन व्यवहाराचे आरोप होत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत शपथपत्रात सर्व माहिती दिली आहे. एक महिन्यात म्हणजे 12 डिसेंबरपर्यंत सोमय्या यांनी पुरावे द्यावे, जर त्यांनी पुरावे दिले नाही तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी', असं ओपन चॅलेंजच गोऱ्हे यांनी सोमय्यांना दिले. तसंच, गाणं म्हणणे, चेहरा बदलणे, अगोदरचा चेहरा नंतरचा चेहरा आणि वाटेल ती विधानं करणे, असं त्यांना जमलं आहे. पण यात रश्मी ठाकरे कधी पडलेल्या नाहीत, असं म्हणत गोऱ्हे यांनी भाजप नेत्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार, सरकारकडून मिळणार भाऊबीजेची भेट 'दिवाळीनंतर ठाकरे सरकार कोसळणार असं वक्तव्य नारायण राणे केले होते', याबद्दल विचारले असताना गोऱ्हे म्हणाल्या की, 'नारायण  राणे हे  वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे तोंडी येईल ती बडबड राणे करत आहे' 'गुंडगिरीला कधीही राजाश्रय दिला नाही. उत्तर भारतातील भाजप नेत्यांची महिलांविषयक वक्तव्ये जरा तपासून बघा. मुळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणं हे त्यांच्या वर्मावरचे बोट झाले आहे. त्यामुळे भाजप नेते वारंवार आरोप करत आहे', असंही गोऱ्हे म्हणाल्या.
  Published by:sachin Salve
  First published: