मराठी बातम्या /बातम्या /पुणे /भोसले जमीन प्रकरणी EDकडून महसूल अधिकाऱ्यांची चौकशी, खडसेंनी काढली होती ऑर्डर

भोसले जमीन प्रकरणी EDकडून महसूल अधिकाऱ्यांची चौकशी, खडसेंनी काढली होती ऑर्डर

Eknath Khadse ED: एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. काल ईडीनं त्यांची 9 तास चौकशी केली.

Eknath Khadse ED: एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. काल ईडीनं त्यांची 9 तास चौकशी केली.

Eknath Khadse ED: एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. काल ईडीनं त्यांची 9 तास चौकशी केली.

पुणे, 09 जुलै: भोसरी भूखंडापाठोपाठ भोसले जमीन प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) महागात पडण्याची शक्यता आहे. ईडीनं (ED) पुण्यातील (Pune) दोन महसूल अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावलं होतं, अशी माहिती मिळत आहे.

खडसेंनी भोसलेंच्या जमिनीसंदर्भात काढलेल्या ऑर्डरची ईडीने माहिती मागवली आहे. महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसले जमिनीसंदर्भात ऑर्डर काढली होती. अविनाश भोसले पाठोपाठ खडसेही ईडीच्या रडारवर आहेत.

ईडीकडून गेल्या काही दिवसात पीएमसी, पीसीएमसी, सहकार खात्यांच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध घोटाळ्यातील कागदपत्रांची ईडी मागणी करत असल्याचंही समजतंय. त्यामुळे भविष्यात आणखी कोण ईडीच्या रडारवर आहे असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा- पुणेकरांनो, मेट्रोच्या पहिल्या ट्रायल रनचा VIDEO पाहिलात का? 

एकनाथ खडसेंची 9 तास चौकशी

भोसरी जमीन घोडाळा (Bhosari Land Scam) प्रकरणात एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी (ED interrogates Eknath Khadse for 9 hours) झाली. ही चौकशी झाल्यावर एकनाथ खडसे यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया देत माहिती दिली, एकनाथ खडसे यांनी ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. सर्व कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत आणि उर्वरित कागदपत्रे 10 दिवसांत सबमिट करू. एकनाथ खडसे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलेले नाहीये मात्र, गरज पडल्यास एकनाथ खडसे पुन्हा चौकशीसाठी हजर होतील.

हेही वाचा- कोरोनानंतर Bone death चा धोका; नेमका काय आहे हा आजार?

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.

First published:
top videos

    Tags: Eknath khadse, NCP, Pune, Scam