• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यात कोथरूड ते आनंदनगर मेट्रोची पहिली ट्रायल रन चाचणी पार, बघा LIVE VIDEO

पुण्यात कोथरूड ते आनंदनगर मेट्रोची पहिली ट्रायल रन चाचणी पार, बघा LIVE VIDEO

Pune Metro Trial Run: पुणेकरांना आता लवकरच मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. मेट्रो लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे.

  • Share this:
पुणे, 09 जुलै: पुणेकरांना (Pune) आता लवकरच मेट्रोतून (Metro) प्रवास करता येणार आहे. मेट्रो लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी प्रशासनानं मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे. गुरुवारी रात्री पुण्यातील कोथरुड येथून वनाझ कॉर्नर (मेट्रो डेपो) ते आनंद नगर या मार्गावर प्रथमच मेट्रोची चाचणी पार पडली. (Pune metro trial run) रात्री 10.30च्या सुमारास कोथरूड येथील मेट्रो डेपो ते आनंद नगर अशा तीन कोचची मेट्रो रुळावरून धावली. वनाझ (चांदनी चौकाजवळ) ते रामवाडी हा कॉरिडॉर आहे. त्यातील कोथरूड भागातील पौड रोडवर वनाझ ते आनंद नगर मार्गावर मेट्रोची ट्रायल रन झाली. या ट्रायल रनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या ट्रायल चाचणीनंतर पुणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published by:Pooja Vichare
First published: