मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

बँकेनं 35 लाखांचं कर्ज नाकारलं, निराश झालेल्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल!

बँकेनं 35 लाखांचं कर्ज नाकारलं, निराश झालेल्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल!

'गावात इतर लोकांना कर्ज देण्यात आली. मी, फक्त दूध व्यवसायासाठी कर्ज मागितले होते. मला खूप त्रास सहन करावा लागला'

'गावात इतर लोकांना कर्ज देण्यात आली. मी, फक्त दूध व्यवसायासाठी कर्ज मागितले होते. मला खूप त्रास सहन करावा लागला'

'गावात इतर लोकांना कर्ज देण्यात आली. मी, फक्त दूध व्यवसायासाठी कर्ज मागितले होते. मला खूप त्रास सहन करावा लागला'

  • Published by:  sachin Salve

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 28 ऑगस्ट : राज्यात शेतकरी आत्महत्याचं (farmer commits suicide) सत्र सुरूच आहे.  पुणे (pune) जिल्ह्यातील दौंड (dound) तालुक्यात बँकेनं कर्ज (bank loan) न दिल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  नानासो मच्छिंद्र शेळके असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.  या शेतकऱ्याने बँकेकडून कर्ज न मिळाल्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत या सर्वाचा उलगडा झाला आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज न दिल्यामुळे  आत्महत्या केली असल्याचे आरोप शेळके यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.  चिठ्ठीत देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि अधिकाऱ्यांचे नावे आहेत.

ड्रग पेडलरच्या चौकशीनंतर बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरी NCB ची छापेमारी

या शेतकऱ्याने दूध व्यवसायावर 35 लाख रुपये कर्ज मागितले होते. मात्र, अडीच एकर क्षेत्र असल्याने बँकेने कर्ज देण्याची तयारी दाखवली नाही. त्यामुळे निराश झाल्यामुळे आत्महत्या केली, असल्याची माहिती समोर आली आहे.

शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये का म्हटलं?

माझ्याकडे जुने कर्ज होते. नवीन कर्ज काढून देतो असं सांगण्यात आलं होतं. मी त्यांना निवडणुकीत मदत केली. माझा वापर त्यांनी फक्त मतदानासाठी केला. माझी परिस्थिती नसतानाही त्यांनी कर्ज भरायला लावले. मी ते पैसे बाहेरून जमा केले. मला कर्ज प्रकरणाचे संपूर्ण पेपर जमा करण्यासाठी सांगितले. मी कर्ज पूर्ण भरल्यावर मला कर्ज देण्यास टाळाटाळ केली. मी थोरात यांच्याकडे विनंती केली त्यांनी होकार दिला आणि आमच्यासमोर फोनवर सांगितले.

अखेर 'तो' रिक्षाचालक पोलिसांना सापडला, औरंगाबादमधील घटनेला नवे वळण

नंतर अधिकारी सोसायटी सचिव यांनी गडदरे साहेब, संदीप काळे यांनी माझा विश्वासघात केला. मी अजित पवार यांच्याकडे निवेदन दिलं. पण, त्यानंतरही अधिकाऱ्यांनी मला उडवाउडवीची उत्तर दिली. गावात इतर लोकांना कर्ज देण्यात आली. मी, फक्त दूध व्यवसायासाठी कर्ज मागितले होते. मला खूप त्रास सहन करावा लागला. माझी मानसिक स्थिती खूप बिघडली आहे व असा अन्याय कुणावरही करू नये. माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ नये. माझ्या मृत्यूनंतर जमीन ही माझ्या नातेवाईकांना द्यावी, असंही शेळके यांनी पत्रात म्हटलं आहे.

First published:

Tags: Pune