अखेर 'तो' रिक्षाचालक पोलिसांना सापडला, औरंगाबादमधील घटनेला नवे वळण

अखेर 'तो' रिक्षाचालक पोलिसांना सापडला, औरंगाबादमधील घटनेला नवे वळण

आज सकाळी एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची ही घटना होती. औरंगाबादच्या मोंढा नाका ते आकाशवाणी चौक दरम्यान ही घटना घडली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 28 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये  (Aurangabad Crime News Update) आज एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर पोलिसांनी एका दिवसात आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. हा रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद पहुळकर (वय 50 ) असं रिक्षाचालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा रिक्षाचालक फुल नशेत रिक्षा चालवत होता. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक केली होती, त्यावेळी सुद्धा तो मद्यधुंद अवस्थेत होता. आज सकाळी जेव्हा पीडित मुलगी  रिक्षात बसली त्यावेळेस ही रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत होता.

आज सकाळी एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची ही घटना होती. औरंगाबादच्या मोंढा नाका ते आकाशवाणी चौक दरम्यान ही घटना घडली होती. हा व्हिडीओ पाहता रिक्षातून मुलीच्या अपहरणाचा (Crime News) प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

दरम्यान या घटनेचा एक व्हिडीओ (CCTV Footage) समोर आला होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध लावला आणि अवघ्या काही तासांत त्यांना यात यश आले.

VIDEO : सुशांतच्या आठवणींचा उजाळा; अंकिताने शेअर केला Pavitra Rishta 2.0 चा टीजर

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणातील एक वेगळा अँगल समोर येत आहे. मिळालेल्या सीसीटीव्हीमध्ये मुलगी रिक्षातून पडताना दिसत आहे. मात्र त्याच रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली आणि तो मुलीच्या मदतीला गेल्याचं यात दिसत आहे. त्या रिक्षाचालकाने मुलीला उचलून आधार दिला आणि त्यानंतर त्याठिकाणी गर्दी जमायला सुरुवात झाली. ती मुलगी थोडं दूर तिथून पळून गेली. त्याठिकाणी अनेक लोकं जमल्यानंतर नागरिकांच्या ताब्यात मुलीला देऊन रिक्षा चालक गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. अखेर या रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिक  तपास करत आहे.

Published by: sachin Salve
First published: August 28, 2021, 8:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या