मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरी NCB ची छापेमारी; ड्रग पेडलरच्या चौकशीतून झाला खुलासा

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरी NCB ची छापेमारी; ड्रग पेडलरच्या चौकशीतून झाला खुलासा

गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला TV कलाकार गौरव दीक्षित यालाही अटक करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला TV कलाकार गौरव दीक्षित यालाही अटक करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला TV कलाकार गौरव दीक्षित यालाही अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 28 ऑगस्ट : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) टीमने शनिवार सकाळी एका ड्रग पेडलरला अटक केली आहे. या पेडरलचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. गुप्त सूचनेच्या आधारावर एनसीबीने बॉलीवुड अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) याच्या घरावर छापेमारी केली आहे. झोनल डायरेक्टर  समीर वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी सुरू आहे. एनसीबीकडून अभिनेत्याच्या घरात तपास सुरू आहे. ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी करण्यात आली. (NCB raid on Bollywood actor Arman Kohlis house Action after investigation of drug peddler )

केंद्रीय एजन्सी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) जेव्हापासून सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Case) तपास सुरू केला आहे, त्यानंतर ड्रग्ज संबंधित नवनवे खुलासे झाले आहेत. पुराव्यांच्या आधारावर एनसीबीकडून बॉलिवूड आणि सिनेसृष्टीतील अनेकांच्या घरात छापेमारी करण्यात आली. यानंतर हा तपास अधिक वेगाने सुरू असल्याचं दिसून येत आहे. (Bollywood Drugs Case) आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात अनेक मोठ मोठ्या अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे. पुराव्याच्या आधारावर काहींवर कारवाईदेखील झाली आहे.

हे ही वाचा-NCB च्या रेडदरम्यान फिल्मी स्टाइल फरार अभिनेता अखेर अटकेत

TV कलाकार गौरव दीक्षित याला शुक्रवारी (27 ऑगस्ट) अटक करण्यात आली आहे. गौरव याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी गौरवच्या घरात NCB ने छापेमारी केली होती. या छापेमारीत MD ड्रग्स, चरस आणि दूसरे ड्रग्स जप्त केले होते. चित्रपट कलाकार एजाज खान याच्या चौकशीच्या आधारावर गौरव याला अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Drugs, Mumbai, NCB