आषाढी वारी सोहळा होणार की नाही? अजित पवारांसमोर आज फैसला, संप्रदायानं घेतली ही भूमिका

आषाढी वारी सोहळा होणार की नाही? अजित पवारांसमोर आज फैसला, संप्रदायानं घेतली ही भूमिका

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात येणाऱ्या आषाढी वारी सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 15 मे: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात येणाऱ्या आषाढी वारी सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. यंदा आषाढी वारी होणार की नाही? अशी संभ्रमावस्था सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर निर्माण झाली आहे. याबाबत शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..कोरोनामुळे साखर उद्योग मोठ्या संकटात, शरद पवारांनी मोदी सरकारला सुचवले 5 उपाय

अजित पवार, प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांच्या दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

आषाढी वारी सोहळा कसा असावा, याबाबत चोपदारांनी प्रारूप आरखाडा तयार केला आहे. हा आराखडा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. आता हा आराखडा अंतिम मानून पालखी सोहळ्याचे स्वरूप ठरते की अन्य काही सूचना दिल्या जातात, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

या बैठकीला देहू ,आळंदी, सासवड आणि पंढरपूर मंदिर समितीचे प्रमुख आणि चोपदार उपस्थित राहतील. त्याचबरोबर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेतील अधिकारीही उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, आषाढी वारीत सात संतांच्या प्रमुख मानल्या जाणाऱ्या मानाच्या सात पालख्यांसोबत लाखो वारकरी चालत पंढरपूरला पोहोचतात. याशिवाय राज्यभरातून 150 पालख्या पंधरपूरात दाखल होतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळे पुण्यातून, निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर, सोपानदेव यांची सासवड, नाथ महारकांची पैठण तर मुक्ताईची मुक्ताईनगरमधून येतात. मात्र, कोरोनामुळे या पालखी सोहळ्यावर प्रश्नचिंन्ह उपस्थित झालं आहे. पालख्यांच्या मूळस्थान मुळात रेड झोन आहे. पुणे, पिंपरीचिंचवड, नाशिक, पैठण, मुक्ताईनगर रेडझोनमध्ये आहेत. एवढंच नाही तर सोलापूर जिल्हा देखील रेड झोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत आषाढी वारीला परवानगी दिल्यास कोरोना व्हायरस आणखी पसरण्याची भीती आहे. तर दुसरीकडे वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा... धोका वाढला! जालन्यात कोरोनाचा संसर्ग पसरला, डॉक्टर तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

वारकरी संप्रदायानं घेतली ही भूमिका..

दरम्यान, कोरोनामुळे गुढीपाडवा, अक्षय तृतीयसारख्या सर्वात मोठा धार्मिक उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. त्यामुळे यंदा आषाडी वारीलाही कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

First published: May 15, 2020, 11:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading