धोका वाढला! जालन्यात कोरोनाचा संसर्ग आणखी पसरला, डॉक्टर तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

धोका वाढला! जालन्यात कोरोनाचा संसर्ग आणखी पसरला, डॉक्टर तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

जालन्यात सामान्य नागरिक, पोलिस आणि परिचारिकेनंतर आता जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

  • Share this:

जालना, 15 मे: जालन्यात सामान्य नागरिक, पोलिस आणि परिचारिकेनंतर आता जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत एक 28 वर्षीय कंत्राटी डॉक्टर तरुणी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा सरकारी रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या या 28 वर्षीय तरुणीच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. याबाबतचा अहवाल नुकताच जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला असून सदर महिला डॉक्टर पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा.. मुंबई पोलीस दलात कोरोनाची दहशत! 9 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

डॉक्टर महिला जालना शहरातील अंबड चौफुली येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जालन्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 18 वर पोहोचला आहे. यापैकी परतूर तालुक्यातील शिरोळी येथील महिला आणि एसआरपीएफचे 4 जवान कोरोना निगेटिव्ह झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर उर्वरित रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं कडक अमंलबजावणी सुरु केली आहे. शहरांत सम आणि विषम तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. सम तारखेला सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी आस्थापना चालू राहतील, तर विषम तारखेला पूर्ण शहर लोकडाऊन होईल, यामध्ये सर्व आस्थापना बंद राहतील. म्हणून आजपासून (15 मे) ही विषम तारीख आहे. या विषम तारखेला शहरांत पूर्णपणे लॉकडाऊन होईल.

हेही वाचा.. दिल्लीहून आलेल्या प्रवाशांचा क्वारंटाईन व्हायला नकार; सरकारने परत केली पाठवणी

अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा भाजीपाला इतर वस्तूंच्या खरेदीसाठी कोणीही रस्त्यावर येणार नाही जर का कोणी रस्त्यावर विनाकारण फिरत असतील तर त्याची गाडी जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत जर का कुणी असा माणूस रस्त्यावर आला तर त्याची गाडी जप्त केली जाईल. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई केली जाईल.

जनतेला पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, विषम तारीख असल्यामुळे कोणताही बहाणा करून रस्त्यावर येऊ नये. जर कोणी रस्त्यावर आलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे आणि गुन्हा दाखल केला जाणार आहे.

First published: May 15, 2020, 7:42 AM IST

ताज्या बातम्या