पवार कुटुंबातील तरुणांना ऑफर, भाजपमध्ये प्रवेशाचे दरवाजे खुले

पवार कुटुंबातील तरुणांना ऑफर, भाजपमध्ये प्रवेशाचे दरवाजे खुले

'काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नेते थकले आणि नवीन पिढी पक्षात थांबायला तयार नाही. त्यामुळे भविष्यात पवारांच्या घरातलं कुणी पक्षात आलं तर आश्चर्य नको' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 09 ऑक्टोबर : भविष्यात जर पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये येणार असेल तर त्याचं आश्चर्य वाटू देऊ नका असं भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 'काँग्रेस राष्ट्रवादीचे मोठे नेते थकले आणि नवीन पिढी पक्षात थांबायला तयार नाही. त्यामुळे भविष्यात पवारांच्या घरातलं कुणी पक्षात आलं तर आश्चर्य नको' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तरुण तडफदार असतील आणि त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल तर आमचे दरवाजे खुलेच राहणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, युतीमध्ये मुख्यमंत्री पद कोणाला दिलं यावर विचारलं असता पुढचा मुख्यमंत्री कोण हे अद्याप ठरलेलं नाही. ते निवडणुकांनंतर ठरेल. मात्र, मला मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखतीतले प्रमुख मुद्दे

- पुण्यातील पाणीकपात ,वाहतूक कोंडी ,कचरा कोंडी,नदीपात्रातील रस्ता हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्याचा पाठपुरावा करणार

- टोचून बोलणे ही फक्त पुणेरी वृत्ती नाही ती सगळीकडे आहे.

- निवडणुकीत जात येणं दुर्दैवी

- मराठा का जैन, उमेदवार ब्राम्हण का नाही

- हे चित्र बदलायला 5, 10 वर्षे लागतील

- मी कुणाच्याही उचकवण्यामुळे निवडणूक लढवत नाहीये

- कोथरुड सुरक्षित आहे असं वाटत असेल तर विरोधकांनी घरी बसावं

- तुम्हाला उमेदवार मिळेना

- घटक पक्ष नसताना मनसेला पाठिंबा दिला

इतर बातम्या - 'इतका कडक गांजा देशात आला कुठून'; आदित्य ठाकरेंविरोधातल्या पोस्टमुळे खळबळ

- तुमच्यात लढण्याची हिम्मत नाही म्हणून मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवावी लागली

- राज ठाकरे यांची जुनी ओळख आहे. मात्र, ते स्वतः चा वापर करू देणार नाहीत असं वाटत होतं

दरम्यान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत दादा पाटील यांची शनिवारी पुण्यात बैठक झाली होती. त्यात ब्राह्मण समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.

इतर बातम्या - उदयनराजेंच्या संपत्तीत 5 महिन्यात झाली इतकी वाढ; प्रतिस्पर्धी उमेदवार गर्भश्रीमंत

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून आगामी सरकारच्या माध्यमातून त्या तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलं होतं. परिणामी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. चंद्रकांत पाटलांचे कोथरुडमधील विघ्न दूर झाली.

ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता आणि राज्याच्या व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीस ब्राह्मण महासंघातर्फे पूर्ण पाठिंबा देण्यात येत आहे, असेही या निवेदनात स्पष्ट केले होते.

इतर बातम्या - पातळी घसरली! निवडणूक प्रचारात शिवसेना बंडखोराचं आई, पत्नीबाबत अशोभनीय वक्तव्य

Published by: Renuka Dhaybar
First published: October 9, 2019, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading