उदयनराजेंच्या संपत्तीत 5 महिन्यात झाली इतकी वाढ; प्रतिस्पर्धी उमेदवार देखील गर्भश्रीमंत

उदयनराजेंच्या संपत्तीत 5 महिन्यात झाली इतकी वाढ; प्रतिस्पर्धी उमेदवार देखील गर्भश्रीमंत

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये आलेले छत्रपती उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी ही लढत होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 09 ऑक्टोबर: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात 21 तारखेला मदतान होत आहे आणि त्याचे निकाल 24 तारखेला जाहीर होतील. या 288 विधानसभेसोबतच राज्यात लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणू्क देखील होत आहे. संपूर्ण राज्यातील विधानसभा निवडणुकीवर जितके लक्ष आहे तितकेच लक्ष साताऱ्यात होणाऱ्या या पोटनिवडणुकीवर आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये आलेले छत्रपती उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी ही लढत होणार आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना उदयनराजे यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतनंतर अवघ्या 5 महिन्यात उदयनराजेंच्या संपत्तीत दीड कोटींनी वाढ झाली आहे. उदयनराजे यांची एकूण मालमत्ता 13 कोटी 81 लाखवरून 14 कोटी 44 लाखांवर पोहोचली आहे. त्यांच्याकडे 40 किलोचे दागदागिने देखील आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार उदयनराजेंकडे ऑडी, मर्सिडिज बेन्झ, इण्डेवर अशा गाड्या देखील आहेत. याशिवाय 185 कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यातून त्यांना उत्तन्न देखील मिळते.

व्यवसाय 'सुखवस्तू'

उदयनराजेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांचा व्यवसाय सुखवस्तू असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्यावर एक कोटी 82 लाखांचे वाहन कर्ज देखील आहे.

कट रचून खुनाचा प्रयत्न...

राजेंवर एकूण 23 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खंडणी, कट रचून खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळे आणणे अशांचा समावेश आहे. याशिवाय शरद लेवे खून प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पण या निर्णयाच्या विरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवार देखील गर्भश्रीमंत

उदयनराजेंच्या विरुद्ध निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे देखील श्रीमंत आहेत. पाटील यांच्याकडे 10 कोटींची जंगम संपत्ती तर 11 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पाटील यांनी मुंबईतील वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण सोसायटीला 60 लाखांचे कर्ज दिल्याचे म्हटले आहे.

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 11:14 AM IST

ताज्या बातम्या