पातळी घसरली! निवडणूक प्रचारात शिवसेना बंडखोराचं आई, पत्नीबाबत अशोभनीय वक्तव्य

पातळी घसरली! निवडणूक प्रचारात शिवसेना बंडखोराचं आई, पत्नीबाबत अशोभनीय वक्तव्य

जैसवाल यांच्या वक्तव्यामुळे बदनामी झाल्याचंही रेड्डी यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

  • Share this:

नागपूर, 09 ऑक्टोबर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातलं राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना बंडखोर आशिष जैसवाल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजपचे उमेदवार आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी ही तक्रार केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेड्डी यांच्या आई आणि पत्नीबाबत अशोभनीय वक्तव्य केलं म्हणून आशिष जैसवाल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

जैसवाल यांच्या वक्तव्यामुळे बदनामी झाल्याचंही रेड्डी यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, अशोभनीय वक्तव्यामुळे तक्रार दाखल होण्याचं यंदाच्या निवडणुकीतलं हे पहिलं प्रकरण आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, नागपूर पश्चिम मतदारसंघ व्हीआयपी मतदारसंघ आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक व्हीआयपी इथे राहतात. 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना होऊन नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातला काही भाग वेगळा झाला आणि नागपूर दक्षिण-पश्चिम हा नवा मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे 2009 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढले आणि विजयी झाले.

भाजपने 2009मध्ये सुधाकर देशमुख यांना संधी दिली. सुधाकर देशमुख यांनी 2009 आणि 2014 मध्ये विजय मिळवला. 2009 च्या निवडणुकीत सुधाकर देशमुख यांच्याविरुद्ध काँग्रेसचे अनिस अहमद अवघ्या 1 हजार 980 मतांना पराभूत झाले. पण 2014 मध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी त्यांचा 26 हजार 402 मतांनी पराभव केला.या मतदारसंघात सलग 6 वेळा भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे पुन्हा सातव्यांदा भाजप विजयी होतो का असाच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.

इतर बातम्या - धक्कादायक! मुलांना सांभाळण्याच्या टेंशनमुळे पित्याने पोटच्या 2 पोरांचा आवळला गळा

2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते नितीन गडकरी यांना नागपूर पश्चिम मतदारसंघात 27 हजार 252 मतांची आघाडी मिळाली. मात्र, 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांचं मताधिक्य नागपूर पश्चिममध्ये काही अंशी घटलं आहे. ही सुद्धा भाजपसाठी काहीशी चिंतेची बाब आहे.

नागपूर शहरातल्या इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत नागपूर पश्चिममध्ये नेहमीच इच्छुकांची गर्दी जास्त असते. संमिश्र स्वरुपाच्या जातीय, सामाजिक, भाषिक समीकरणामुळे निवडणुकीची गणितंही बदलतात. गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सुधाकर देशमुख इथले आमदार असले तरी यावेळी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे.

सुधाकर देशमुख हे विद्यमान आमदार आहेत पण भाजप इथे उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौर नंदा जिचकार, भूषण शिंगणे, जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल असे काहीजण इच्छुक आहेत. राज्यमंत्री परिणय फुके यांचंही नाव इथे चर्तेत आहे.

इतर बातम्या - आम्ही एकत्र येऊ; कारण... शरद पवार थकलेत आणि आम्ही सुद्धा!

काँग्रेसमधून विद्यमान शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना उमेदवारी हवी आहे. त्यांच्याशिवाय नरेंद्र जिचकार, नगरसेवक नितीश ग्वालबंशी, संदेश सिंगलकर असे युवा नेतेही रांगेत आहेत.

या मतदारसंघात बसपाची भूमिकाबी महत्त्वाची आहे. सध्या तरी बसपामधून सुभाष सरोदे आणि अविनाश बडगे ही नावे चर्चेत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अजून स्पष्ट नाही.

2014 विधानसभा निवडणूक निकाल

सुधाकर देशमुख, भाजप - 86 हजार 500

विकास ठाकरे, काँग्रेस – 60 हजार 98

इतर बातम्या - राज ठाकरेंच्या अडचणी संपेनात, पुण्याच्या सभेत आणखी एक ख्वाडा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 10:37 AM IST

ताज्या बातम्या