जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Maharashtra Political Crisis : शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या नेत्यानेही मानला नाही त्यांचा आदेश!

Maharashtra Political Crisis : शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या नेत्यानेही मानला नाही त्यांचा आदेश!

पुण्याच्या जुन्नरमधील फलक

पुण्याच्या जुन्नरमधील फलक

NCP Crisis : शरद पवारांनी त्याचा फोटो वापरु नये, असे सांगितल्यावरही गोंदिया जिल्ह्यात त्यांचा फोटो वापरल्याचे फलक दिसले.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

रवी सपाटे/रायचंद शिंदे, प्रतिनिधी गोंदिया/पुणे, 5 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवारांच्या फोटोवर खुद्द शरद पवारांनीच आक्षेप घेतला आहे. तसंच आपला फोटो वापरू नये, असा सज्जड इशाराही शरद पवारांनी दिला आहे. अजित पवारांच्या गटाकडून वापरण्यात येणाऱ्या पोस्टरवर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मात्र, शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडल्यावरही गोंदियात एक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले अजित पवार यांना शुभेच्छा देणारे फलक संपुर्ण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात लावले आहे. गोंदिया जिल्ह्याचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या मतदारसंघात हे फलक लावले आहे. या फलकाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो त्या फलकावर लावलेले दिसत आहे. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवार गटाला समर्थन दिले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे या फलकांची चर्चा संपुर्ण मतदारसंघात केली जात आहे. शरद पवार यांनी मला विचारल्याशिवाय कोणीही माझा फोटो लावू नये, अशी सक्त ताकीद दिली असतानाही आमदार मनोहर चंदिकापुरे यांनी शरद पवारांच्या फोटो बॅनर लावल्याने याची परिसरात चर्चा होत आहे. तर आमदार म्हणतात शरद पवारांबदल आम्हला आदर आहे. पण 5 तारखेनंतर जी दिशा मिळणार त्या नंतर थोडाफार बदल करु, असे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी म्हटले आहे. पुण्यात काय घडलं -  पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रोडला पंधरा दिवसापूर्वी ज्या ठिकाणी बीआरएस भारत राष्ट्र समितीचे मोठे होर्डिंग लावण्यात आले होते त्या होर्डिंगवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा फोटो झळकत आहे. पवार साहेबांचे फोटो आणि लोगो टाकून आणि राष्ट्रवादी पक्षाचे पक्ष चिन्ह घड्याळ हे प्रिंट करून त्यावर राष्ट्रवादी पार्टी महाराष्ट्र राज्यात भाजपच्या महायुती सरकारमध्ये सामील होऊन एक नवीन विकासाचा मार्ग अवलंबला आहे, अशा स्वरूपात मेसेज झळकत आहे . पुण्याच्या जुन्नरमधील फलक

पुण्याच्या जुन्नरमधील फलक

सदर फ्लेक्सवर राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. त्यांच्या शेजारी प्रफुल्ल पटेल अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचे फोटो या फ्लेक्सवर झळकत आहेत. तसेच या फ्लेक्सवर आंबेगाव तालुक्याचे आमदार आणि माजी गृहमंत्री यांचे शुभेच्छुक म्हणून खाली नाव टाकण्यात आले आहे. काय म्हणाले होते शरद पवार - ‘माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये,’ असं शरद पवार म्हणाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात