Home /News /pune /

Pune : भारत बायोटेकला जमीन देण्याची प्रक्रिया सुरू, पत्रकार परिषदेत अजित पवारांची माहिती

Pune : भारत बायोटेकला जमीन देण्याची प्रक्रिया सुरू, पत्रकार परिषदेत अजित पवारांची माहिती

Ajit Pawar Pune region corona review बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्सही स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातून विविध तयारी केली जात आहे असं अजित पवार म्हणाले.

पुढे वाचा ...
    पुणे, 14 मे : राज्याचे उपमुख्यमंत्री (DCM) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पुणे विभागातील (Pune Region) कोरोनाच्या स्थितीचा आढावा (Corona review) घेतला. कोरोनाच्या स्थितीवर सध्या नियंत्रण मिळवलं जात असून तिसऱ्या लाटेसाठी (Third Wave) सज्ज राहण्याची तयारी सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. विशेषतः तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका (Childrens) असल्याची माहिती मिळत असल्याने त्यादिशेनं तयारी केली जात असल्याची माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत (Ajit Pawar Press Conference) दिली. पुण्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असून पुण्याचील प्रशासन तसेच राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी शुक्रवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या दृष्टीनं आरोग्य विभागानं तयारी सुरू केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळं तिसऱ्या लाटेचा विचार करता वेगवेगळ्या भागात कशी सुविधा आहे त्याचा आढावा घेतला जात आहे. आवश्यक तशी तयारी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं अजित पवार म्हणाले. (वाचा-गोव्यात ऑक्सिजनअभावी 3 दिवसात 41 मृत्यू; अनुभवी ट्रॅक्टरचालक नसल्याचं अजब उत्तर) संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका संभवणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादिशेनं प्रय्तन सुरू केले असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. खास लहान मुलांसाठी बेड सज्ज करण्यात येत असल्याचं अजित पवार म्हणाले. यासंदर्भात बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्सही स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातून विविध तयारी केली जात आहे असं अजित पवार म्हणाले. अशा प्रकारे लहान मुलांना अधिक धोका संभवल्यास त्यांच्या पालकांनी काय करावं याबाबतही जनजागृती करणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. अनेक ठिकाणी सुविधा आणि साहित्य उपलब्ध करण्याची तयारी सुरू असल्याचंही ते म्हणाले. लहान मुलांच्या लसीकरणासाठीदेखिल प्रस्ताव आले आहेत. त्याबाबत चाचण्या सुरू असून त्यांना मान्यता मिळाल्यानंतर लहान मुलांनाही लसीकरण करावंच लागणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. (वाचा-चोरट्यांनी 7 तासात परत केले लंपास केलेले रेमडेसिवीर इंजेक्शन, जालन्यातील घटना) कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण लसींचा पुरवठा कमी असल्यानं 18-44 वयोगटातील लसीकरण थांबवून त्या लसीचा वापर 45 वर्षापुढील ज्यांचे दुसरे डोस शिल्लक आहेत, अशा नागरिकांसाठी केला जात असल्याचं अजित पवार म्हणाले. लसींचे उत्पादन राज्यात वाढवण्यासाटी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यात सीरमची लस तयार होते. त्याप्रमाणे भारत बायोटेकची लस तयार करण्यासाठी पुण्यात जमीन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या वीज व इतर सर्व सुविधा लवकरात लवकर देणार असून साधारणपणे तीन महिन्यात या लसीचे उत्पादन पुण्यात सुरू होऊ शकेल असंही पवारांनी सांगितलं. भारत बायोटेकची लस निर्मती सुरू झाल्यानंतर त्याचा राज्याला फायदा होईल. अर्धी लस केंद्राला दिल्यानंतर उर्वरित अर्धी राज्याला देण्याची मागणी त्यांच्याकडं करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. पुणे विभागात लसीकरणाचा प्रमाण चांगलं असून 24 लाखावर नागरिकांना विभागात लसीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णदेखिल सध्या वाढत आहेत त्यामुळं त्याच्या औषधाचा पुरवठा योग्यरित्या व्हावा याचा प्रयत्न केला जात आहे. हा आजार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आणला आहे. त्यामुळं एक मोठा आधार झाला आहे. पण हा आजार संसर्गजन्य नसल्याने तो संपर्कातून पसरण्याचा धोका नाही असं ते म्हणाले. रेमडेसिविरचा तुटवडा कमी झाला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वितरण सुरू केल्यानं फायदा झाल्याचं अजित पवार म्हणाले. यामुळं जी रुग्णालयं कमी बेड दाखवत होते, त्यांची खरी माहितीही मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajit pawar, Coronavirus, Pune

    पुढील बातम्या