Home /News /national /

Oxygen Shortage in Goa: गोव्यात ऑक्सिजनअभावी 3 दिवसात 41 मृत्यू; कारण काय तर अनुभवी ट्रॅक्टर चालक नाही

Oxygen Shortage in Goa: गोव्यात ऑक्सिजनअभावी 3 दिवसात 41 मृत्यू; कारण काय तर अनुभवी ट्रॅक्टर चालक नाही

मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान गोवा सरकारने (Goa Government) ऑक्सिजन सेवेत अडथळा येण्यामागे तज्ज्ञ ट्रॅक्टर चालकांचा अभाव असल्याचं अजब कारण दिलं आहे.

    पणजी, 14 मे : गुरुवारी गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) येथे ऑक्सिजनच्या अनियमित पुरवठ्यामुळे (Oxygen Shortage in Goa) आणखी 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी याच रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 26 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान गोवा सरकारने (Goa Government) ऑक्सिजन सेवेत अडथळा येण्यामागे तज्ज्ञ ट्रॅक्टर चालकांचा अभाव असल्याचं अजब कारण दिलं आहे. मात्र, न्यायालयानं सरकारला चांगलंच फटकारलं आहे. रुग्णालयात ऑक्सिजन नसल्यामुळं यापुढे कोणत्याही पेशंटचा मृत्यू होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं गोवा सरकारला कठोर आदेश दिले आहेत. बुधवारी रुग्णालयात ऑक्सिजन नसल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता. गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळी 8 पर्यंत 15 रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान, जीएमसीचे नोडल अधिकारी डॉ. विराज खांडेकर म्हणाले की, “ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळं रुग्णालयात रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. गुरुवारी मध्यरात्री ते सकाळी आठच्या दरम्यान ओ 2 सर्व्हिसमध्ये बिघाड झाल्यामुळं 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजन पुरेसा, परंतु प्रशिक्षित चालकांचा अभाव गोवा राज्य सरकारकडून आरोग्य सचिव रवी धवन यांनी न्यायालयासमोर सांगितलं की, राज्यात पुरेसा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन सिलिंडर बदलण्याच्या व्यवस्थेत अडचणी येत आहेत आणि पुरवठा खंडित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. धवन म्हणाले की, "येथे ऑक्सिजनचा कमतरचा नाही, ज्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत त्या लॉजिस्टिकिकल कारणास्तव होत आहेत. यावर उच्च न्यायालयानं त्यांना फटकारत राज्याचे अधिकारी आपली जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत आहेत, असे म्हटले. सरकारनं ट्रक्टर चालकांवर ठेवला ठपका या घटनेबाबत आरोग्य सचिवांनी ट्रॅक्टरचालकांना दोषी धरले आहे. ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करणारे ट्रक्टरचालक अनुभवी नसल्याचे म्हटलं आहे. गुरुवारी रात्री 1.45 ते 2 वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टर रस्त्यात मध्येच कुठेतरी अडकला, बाहेरून सकाळपर्यंत फक्त एक ट्रॅक्टरच येऊ शकला. जीएमसीच्या तळघरात ऑक्सिजन मॅनिफोल्ड व्यवस्थित आहे आणि योग्य कार्यरतही आहे. मात्र, ट्रक्टर घेऊन येणारे ड्रायव्हर रस्त्यातच 15 ते 20 मिनिटे अडकून पडले होते. ज्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर बदलण्यासाठी अतिरिक्त वेळ लागला आणि ही दुर्घटना घडली, असे आरोग्य सचिवांनी न्यायालयात सांगितले. न्ययालयानं राज्य सरकारला फटकारलं राज्य सरकारनं केलेला युक्तिवाद अजिबात तर्कसंगत नसल्याचे न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती एम एस सोनक आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, "ही अशा प्रकारची प्रतिज्ञापत्रे सादर करणे म्हणजे सरकार जबाबदारीपासून दूर पळत असल्याचं लक्षण आहे, समस्या एक आहे आणि उत्तर दुसरेच काही तरी दिलं जात आहे. ट्रॅक्टर मिळू शकले नाही, चालक सापडू शकला नाही, तंत्रज्ञ सापडला नाही ही कारणं आहेत का? लोक मरत आहेत आणि त्यावर तुम्ही अशा गोष्टींची कारणं देत आहात, हे अजिबात मान्य करण्यासारखं नाही, अशा शब्दात न्यायालयानं सरकारला फटकारलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Coronavirus, Goa

    पुढील बातम्या