• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • 3 महिन्याच्या बहिणीचा गळा दाबून अल्पवयीन भावाने मृतदेह पिशवीत टाकून नदीत फेकला

3 महिन्याच्या बहिणीचा गळा दाबून अल्पवयीन भावाने मृतदेह पिशवीत टाकून नदीत फेकला

लहान बहिण घरामध्ये वारंवार रडत असते. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी रडत होती. त्यामुळे

लहान बहिण घरामध्ये वारंवार रडत असते. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी रडत होती. त्यामुळे

लहान बहिण घरामध्ये वारंवार रडत असते. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी रडत होती. त्यामुळे...

 • Share this:
  पुणे, 24 ऑक्टोबर : तीन महिन्यांची बहिणी (sister) सतत रडते म्हणून एका अल्पवयीन मुलाने (younger brother ) गळा आवळून तिचा खून (murder) केला आणि मृतदेह पिशवीत टाकून नाल्यात फेकून दिल्याची मनसुन्न करणारी घटना पुण्यातील (pune) येरवड्यात घडली आहे.  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या तीन महिन्याच्या बहिणीला गळा आवळून खून केल्यानंतर पिशवीत टाकून ती पिशवी नदीपात्रात फेकणाऱ्या अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकाला येरवडापोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणी शनिवारी अपहरणाचा गुन्हा येरवडा पोलिसांनी दाखल केला होता. अधिक तपासात बेपत्ता झालेली तीन महिन्याची बालिका तिच्या मोठया भावानेच नदीपात्रात टाकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. लहान बहीण घरात वारंवार रडते म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. समीर वानखेडेंवर खंडणीच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटलांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा येथील चित्रा चौक इथं ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी तीन महिन्यांची झोपलेली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आईने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता, असं वृत्त दैनिक लोकमतने दिलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा 13 वर्षांचा मोठा भावाची चौकशी केली. पण त्याने दिलेल्या उत्तरांमध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या जबाबावर संशय आला.  त्यानंतर पोलिसांनी त्याची आणखी सखोल चौकशी केली तेव्हा त्याने जे सांगितलं त्यामुळे पोलिसांना धक्काच बसला. आपणच आपल्या तीन महिन्याच्या बहिणीचा खून केल्याचं त्यानं मान्य केलं. Job Alert: सोलापुर महानगरपालिका इथे 'या' पदांच्या विविध जागांसाठी भरती लहान बहिण घरामध्ये वारंवार रडत असते. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी रडत होती. त्यामुळे तिचा गळा आवळला. बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह पिशवीमध्ये भरला आणि पर्णकुटी चौकातील नदीपात्रात फेकून दिला. पोलिसांनी या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह शोधून काढला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. सदरील अल्पवयीन मुलगा हा विधिसंघर्षग्रस्त आहे. तीन महिन्यांपूर्वी ही महिला आपल्या तीन महिन्याच्या मुलगी आणि मुलासह भावाकडे राहण्यासाठी आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
  Published by:sachin Salve
  First published: