मुंबई, 6 मार्च: ऑनलाइन बँकिंगने आपल्यासाठी गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. परंतु तरीही कुठेतरी आपल्याला या सुविधांबद्दल माहिती नाही किंवा माहित असूनही, आळशीपणामुळे त्यांचा पुरेपूर लाभ घेत नाही. बँक स्टेटमेंट ही अशीच एक सुविधा आहे. जी आपण एकतर अजिबात तपासत नाही किंवा गरज पडेल तेव्हाच आपण स्टेटमेंट चेक करतो. तुमच्या बँक खात्यातील प्रत्येक लहान-मोठ्या व्यवहाराचे डिटेल्स ठेवणाऱ्या या फिचरचा वापर न केल्याने नुकसान होऊ शकते. बँक स्टेटमेंट चेक करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कारण बँक स्टेटमेंट हे केवळ तुमच्या दर महिन्याला होणाऱ्या ट्रांझेक्शनचे रेकॉर्डच नाही तर तुमची आर्थिक कुंडलीही सांगते. यासोबतच फायनेंशियल प्लानिंग कशी करावी याविषयीही माहिती तुम्हाला मिळेल. यासोबतच तुम्ही नियमित बँक स्टेटमेंट चेक करत नसाल तर तुमच्यासोबत फ्रॉड देखील होऊ शकतं.
बँका कुठे काय चार्ज आकारत आहेत याची माहिती राहील
तुम्ही बँक स्टेटमेंट तपासत राहिल्यास, हे समजेल की बँक तुमच्या खात्यातून कधी, कोणत्या प्रकारचे आणि किती चार्जेस कापत आहे. यामुळे अकाउंटमधील व्यवहारांचा अंदाज येतो.
‘या’ बँकेनं सुरु केलं खास क्रेडिट कार्ड! स्विगीवर 30% डिस्काउंट; मंथली बोनसही उपलब्धपैसे कुठे खर्च झाले याची चिंता दूर होते
अनेकदा आपण खूप पैसे खर्च करतो किंवा गरजेपोटी अचानक पैसे खर्च होतात. पण किती पैसे खर्च झाले याचा हिशेब आपण ठेवू शकत नाही. अशा वेळी, बँक स्टेटमेंट कामी येते. येथे आपल्याला कळतं की, आपल्या खात्यातून यापूर्वी किती पैसे कापले गेले आहेत. कुठे आणि किती खर्च झाला याविषयीही माहिती मिळते. ज्यामुळे बजटिंग आणि सेविंग्समध्ये मदत मिळते.
‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं होळीचं गिफ्ट, होम लोनवरील व्याजदरात केली घट!बँक बॅलन्सबाबत अपडेट रहा आणि गुंतवणुकीचे नियोजन करा
तुम्हाला माहित असेल की तुमच्या खात्यात कोणत्याही वेळी किती बॅलेन्स राहते. तेव्हा तुम्ही गुंतवणुकीचं नियोजन करू शकता. तुमच्या अकाउंटमध्ये अतिरिक्त पैसे असल्यास, तुम्ही ते अधिक चांगल्या वापरासाठी विम्यामध्ये किंवा गुंतवणुकीत कुठेतरी ठेवू शकता.
बँक स्टेटमेंट चेक करत न राहिल्यास तुमची फसवणूक होऊ शकते
आणखी एक प्लस पॉइंट म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अज्ञात व्यवहाराची माहिती मिळते आणि तुम्ही त्यासाठी योग्य ती कारवाई वेळेत करू शकता. तुमचा फ्रॉडपासून बचाव होऊ शकतो.