रेंटवर एसी घेण्याचा फायदा असा आहे की, जर तुम्ही दुसऱ्या शहरात गेलात तर तुम्हाला तो सोबत घेण्याची चिंता करण्याची गरज नाही. अशा वेळी आज आपण अशा काही प्लॅटफॉर्मविषयी जाणून घेणार आहोत. जेथे तुम्ही एसी रेंटने घेऊ शकता. आता कमी खर्चात बसवता येईल AC, वीज बिलही येईल कमी; जाणून घ्या किंमत?
Rentomojo: ही वेबसाइट बंगळुरु, मुंबई, पुणे, दिल्ली, नोएगा, गुरुग्राम, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, गाझियाबाद आणि कोलकाता यांसारख्या अनेक शहरांमध्ये आपली सर्व्हिस देते. येथून तुम्ही एसी, टीव्ही, फ्रीज, फर्निचर अशा अनेक वस्तू भाड्याने घेऊ शकता. येथे तुम्हाला 1 टन स्प्लिट एसी मिळेल ज्याची किंमत 1,859 रुपये प्रति महिना आहे. अबब! नवरीची साडी 17 कोटी तर दागिने 90 कोटींचे, 'या' शाही लग्नाचा खर्च पाहून तुम्हालाही येईल चक्कर
CityFurnish: या वेबसाइटच्या सेवा दिल्ली, नोएडा, गुडगाव, हैदराबाद, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही घर आणि ऑफिससाठी फर्निचर आणि अप्लायंसेज रेंटवर घेऊ शकता. उन्हाळ्यात AC मुळे जास्त वीजबिल येतंय? या 5 ट्रिक येतील कामी
FairRent: स्प्लिट एसी, विंडो एसी, वॉशिंग मशीन आणि फ्रीज यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू या प्लॅटफॉर्मवरून भाड्याने घेता येतात. येथून तुम्ही 1.5 टन विंडो एसी 1,575 रुपये प्रति महिना खरेदी करू शकता. ग्राहकांना येथे 1 टन, 1.5 टन आणि 2 टनचे पर्याय मिळतील. एसी इन्स्टॉलेशन मोफत केले जाते. तसेच स्टॅबिलायझर देखील मोफत उपलब्ध आहे.