आपल्या लेकीचं लग्न थाटमाटात करावं अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते. यासाठी एक वडील आयुष्यभराची कमाई लेकीच्या लग्नात खर्च करतात. तुम्ही देखील अनेक लग्नात गेले असाल. अनेक शाही लग्न देखील पाहिले असतील. मात्र असं लग्न तुम्ही कधीही पाहिलं नसेल. कारण या लग्नातील खर्च ऐकून तुम्हालाही चक्कर येईल. कारण या लग्नाच अगदी पाण्याप्रमाणे पैसा खर्च झाला होता. नोकरी बदलल्याने अनेक EPF अकाउंट झालेय? लगेच करा मर्ज, अन्यथा...
या लग्नाच्या आमंत्रणावरूनच तुम्हाला या लग्नाच्या राजेशाहीपणाचा अंदाज येऊ शकतो. पाहुण्याना एलईडीच्या स्वरूपात आमंत्रण पाठवले गेले होते, ज्यामध्ये कुटुंब रेकॉर्डिंग व्हिडिओवरून निमंत्रण देते. हे लग्न कर्नाटकचे माजी मंत्री जी जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी हिचे होते. 6 नोव्हेंबर 2016 रोजी हे लग्न झाले.5 दिवस चाललेल्या या सोहळ्यात सुमारे 50 हजार पाहुणे आले आणि 500 कोटींहून अधिक खर्च झाला. ना इंधन ना चार्जिंग, तरीही रस्त्यांवर सुसाट धावते ही 'वंडर कार'; 100 km चा खर्च ऐकून व्हाल चकीत
खाण घोटाळ्यात तुरुंगात असलेले जी. जनार्दन रेड्डी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च केला. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाचा मुद्दा हा संसदेत देखील उपस्थित केला होता. नोटाबंदीनंतर झालेल्या या विवाहावर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी निशाणा साधला होता. कारण जनार्दन रेड्डी हे कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेसचे तत्कालीन खासदार आनंद शर्मा यांनी संसदेत सरकारला विचारले की, रेड्डी यांच्याकडे लग्नासाठी खर्च करण्यासाठी 500 कोटी रुपये कुठून आले? मायावतींसह अन्य काही नेत्यांनीही लग्नाच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते.
या शाही लग्नाला 50,000 हून अधिक पाहुणे पोहोचल्याचा अंदाज लावला जातो. लग्नाच्या निमंत्रणांसाठी एलसीडी स्क्रीन प्लेइंग कार्ड बनवण्यात आले होते. हे कार्ड बॉक्समध्ये येते. ते उघडताच रेड्डी कुटुंबावर चित्रित केलेले गाणे त्यात वाजायला सुरुवात होते. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या पाहुण्यांना लग्नासाठी आमंत्रित करताना दिसत आहेत. हा विवाह बंगळुरू पॅलेस मैदानावर पार पडला होता. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना 40 आलिशान बैलगाड्यांमध्ये गेटपासून आतपर्यंत नेण्यात आले होते. बॉलीवूडच्या आर्ट डायरेक्टरने विजयनगर शैलीतील मंदिरांचे अनेक सेट डिझाइन केले होते. जेवणाच्या जागेची रचना बेल्लारी गावासारखी करण्यात आली होती. बेल्लारी हे रेड्डी यांचे मूळ गाव आहे. 5 वर्षात मालामाल व्हायचंय? पोस्ट ऑफिसची 'ही' स्किम आहे बेस्ट
पाहुण्यांसाठी खास हेलिकॉप्टरची सुविधा : पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी 2000 कॅब आणि 15 हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते. रेड्डी कुटुंबाने बेंगळुरूच्या सर्व फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये सुमारे 1500 खोल्या बुक केल्या होत्या. जवळपास 3000 सुरक्षा कर्मचारी कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आले होते. रेड्डी कुटुंबातील सर्व सदस्यांनी राजांसारखे कपडे घातले होते आणि करोडो रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने परिधान केले होते. हा विवाह सोहळा पाच दिवस चालला.