आता हिवाळा संपला असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे लोकांनी एसी, कूलर आणि फॅनची साफसफाई करून त्यांचा वापर सुरू केला आहे. काही जणांनी तर नवीन कूलिंग उपकरणांची खरेदी सुरू केली आहे. पण, एसीमुळे इलेक्ट्रिसिटी बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. उन्हाळ्यातील चार ते पाच महिने जास्त बिल भरताना आपलं घरखर्चाचं बजेट कोलमडू शकतं. म्हणजेच नवीन एसी खरेदी करणं खूप सोपं आहे पण, त्यामुळे येणारं बिल भरणं कठीण आहे. जर तुम्हीदेखील एसीच्या वाढत्या बिलामुळे वैतागलेले असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने वीज बिल खूपच कमी येईल, या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.
एका रिपोर्टनुसार एसीचं तापमान एक अंशाने वाढल्यास वीज बिलात सुमारे 6 टक्के बचत होते. तुम्ही डीफॉल्ट तापमानात एसी चालवल्यास, तुम्ही तुमचं वीज बिल 25 टक्के कमी करू शकता.
जर तुम्ही घरी एसी वापरत असाल तर सीलिंग फॅनचाही वापर करावा. एसीसोबत सीलिंग फॅन चालवल्यास संपूर्ण खोलीत हवा व्यवस्थित पसरते आणि जास्त वेळ एसी लावण्याची गरज नसते. त्यामुळे एसीचं वीज बिल कमी होतं.
जर तुम्ही एसी सर्व्हिसिंग करण्याबाबत निष्काळजी असाल तर तुम्ही त्याबाबत खबरदारी घ्यावी. तुम्ही एसी सर्व्हिस नियमितपणे करून घ्यायला हवी. यामुळे व्हेंट आणि डक्टमध्ये साचलेली घाण साफ होते. जर तुम्ही एसीचं सर्व्हिसिंग करून घेतलं नसेल, तर एसीला हवा फेकण्यासाठी किंवा पसरवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते आणि त्यामुळे विजेचा वापर 5 ते 15 टक्क्यांनी वाढतो.
एसी लावताना खोली नेहमी बंद ठेवा. यामुळे थंड हवा खोलीबाहेर जाणार नाही आणि तुमची खोली कमी वेळात थंड होईल. त्यामुळे एसीवर लोड पडणार नाही आणि वीज बिलही कमी येईल. आता आधार कार्डवर होणार नाही फसवणूक! UIDAI ने लॉन्च केले नवीन सेफ्टी फिचर
तुम्ही एसी वापरत असाल तर तुम्ही टीव्ही किंवा कॉम्प्युटर वापरू नये कारण ही उपकरणं जास्त उष्णता निर्माण करतात. त्यामुळे खोली थंड करण्यासाठी एसीला आणखी काम करावं लागतं आणि त्यासाठी वीजही जास्त लागते. Milk Price Hike: महागाईचा भडका! मुंबईत म्हशीच्या दुधाच्या किंमती वाढल्या