उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता नवे पंखे, एसी, कूलर वगैरे घेण्याची तयारी अनेक घरांत सुरू झाली असेल. पंखे सर्वसामान्य नागरिकांनाही परवडू शकतात; मात्र एसी अर्थात एअर कंडिशनर घेणं सर्वांना परवडणारं असत नाही. शिवाय त्यामुळे येणारं लाइट बिलही जास्त असल्याने दर महिन्याला त्यावर होणारा खर्च मोठा असतो. ट्युपिक (Tupik) या गुजरातमधल्या एका भारतीय कंपनीने कमी वीजवापर करणारा एअर कंडिशनर तयार केला आहे. अन्य कोणत्याही एसीच्या तुलनेत हा एसी खूप कमी म्हणजे 400 वॅट वीजवापर करतो. या एसीचं वजन 13 किलो असून, त्याचा आकार आटोपशीर आहे. या एसीचं फिटिंग करण्यासाठी विशेष वायरिंग करावं लागत नाही, तसंच इलेक्ट्रिशियनचीही आवश्यकता भासत नाही. एकट्यालाही हा एसी सहज बसवणं शक्य आहे. ट्युपिक कंपनीचा हा एसी म्हणजे बेड एसी असून, तो सिंगल बेड किंवा डबल बेडवर बसवता येऊ शकतो. या कंपनीचा असा दावा आहे, की एखाद्या पेडेस्टल फॅनपेक्षाही या एसीचा आवाज कमी असतो. आपल्या बेडच्या आकारानुसार तो एसी फिट केला जाऊ शकतो. अन्य एसीप्रमाणेच ट्युपिकचा हा एसीदेखील हवा थंड करण्यासाठी R134 रेफ्रिजरंटचा वापर करतो. या एसीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो इको-फ्रेंडली आहे.
उन्हाळ्यात AC मुळे जास्त वीजबिल येतंय? या 5 ट्रिक येतील कामीकोणताही एसी बसवल्यानंतर खोलीचे दरवाजे-खिडक्या बंद कराव्या लागतात; ट्युपिकचा एसी मात्र त्याला अपवाद आहे. हा एसी लावल्यानंतर खिडकी उघडता येते. किंबहुना खिडकी उघडी ठेवली, तर हा एसी आणखी चांगल्या प्रकारे काम करतो.
Term Insurance खरेदी करताना ‘या’ गोष्टी अवश्य बघा, होईल फायदाच फायदा!हा एसी उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा कोणत्याही ऋतूत वापरणं शक्य आहे. थंडीच्या दिवसांत खोलीतली हवा उष्ण करण्यासाठी या एसीचा उपयोग होतो. तसंच, उन्हाळाच्या दिवसांत हा एसी सुरू केल्यानंतर तीन मिनिटांतच यातला कॉम्प्रेसर हवा थंड करण्याचं काम सुरू करतो. हा एसी 9 ते 13 अंश सेल्सिअस एवढं थंड तापमान देतो. कंपनीचा असा दावा आहे, की खोलीतलं तापमान 50 अंश सेल्सिअस असलं, तरी हा एसी कार्यरत राहू शकतो. ट्युपिक एसी विजेवर चालतो. त्यासाठी पाणी, गॅस, बॅटरी वगैरे त्यात काही घालावं लागत नाही. हा एसी जनरेटर, यूपीएस, बॅटरी आणि सौर ऊर्जेवरही चालवता येऊ शकतो. त्याची स्वच्छा राखणंही सोपं आहे. त्याचे फिन्स आणि फिल्टर्स साफ केले, की झालं.
ट्युपिक एसीची दोन मॉडेल्स आहेत. सिंगल बेड मॉडेलची किंमत 17,990 रुपये असून, डबल बेड मॉडेलची किंमत 19,990 रुपये आहे. या एसीवर कंपनीची एक वर्षाची वॉरंटी आहे