तुम्ही सॅलरी अकाउंट वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. ऑर्गेनाइजेशन काम करताना कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी अकाउंट उघडले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, सॅलरी अकाउंटमधून तुम्हाला बँकेकडून किती फायदे मिळतात. त्याविषयीच सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा 'हे' काम
सॅलरी अकाउंटला लागू होणारे नियम उर्वरित सेविंग अकाउंटपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. सॅलरी अकाउंटमध्ये कोणत्याही मिनिमम बॅलेन्सची गरज नसते. परंतु जर तुम्ही काही कारणास्तव नोकरी सोडली आणि तीन महिने पगार त्या खात्यात जमा झाला नाही. तर अकाउंट जनरल अकाउंटमध्ये रूपांतरित केला जातो. त्यानंतर नॉर्मल सेविंग्स अकाउंटप्रमाणेच चार्ज आकारले जाते. अशा अनेक बँका आहेत ज्या सॅलरी अकाउंटवर मिळणारे फायदे त्यांच्या ग्राहकांसोबत शेअर करतात. यंदाच्या ITR फॉर्ममध्ये झालेय 'हे' पाच बदल! अवश्य घ्या जाणून
सॅलरी अकाउंट असणाऱ्यांनी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी : तुम्ही नोकरी किंवा खाते बदलल्यानंतर तुमचे सॅलरी अकाउंट बंद केले नाही तर त्यात मिनिमम बॅलेन्स ठेवा. असे न केल्यास, बँक त्या सेविंग अकाउंटवर मेंटेनेंस फी किंवा दंड आकारू शकते. भरमसाठ परतावा हवाय? 'या' स्किम्स आहेत बेस्ट, टॅक्स बेनिफिटचाही मिळेल लाभ
सॅलरी अकाउंटच्या बाबतीत बँका एका बँकेतून दुसऱ्या बँकेत खाते बदलण्याची प्रक्रिया सोपी ठेवतात. अर्थात त्यात त्यांनी काही अटी नक्कीच ठेवल्या आहेत. सॅलरी अकाउंट उघडण्यासाठी, तुम्ही कॉर्पोरेट संस्थेमध्ये कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच, तुमच्या कंपनीचे त्या बँकेशी सॅलरी अकाउंट रिलेशनशिप असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय ग्राहकांचे त्याच बँकेत दुसरे कोणतेही खाते नसावे.
सॅलरी अकाउंटमध्ये मिळतात या सुविधा : सॅलरी अकाउंट असल्यास, बँक तुम्हाला पर्सनलाइज्ड चेक बुक देते. ज्यावर प्रत्येक चेकवर तुमचे नाव छापले जाते. तुम्ही बिल पेमेंटची सेवा घेऊ शकता किंवा फोन किंवा इंटरनेटद्वारे पेमेंट करू शकता. बँका सेफ डिपॉझिट लॉकर, स्वीप-इन, सुपर सेव्हर सुविधा, फ्री पेबल-एट-पार चेकबुक, फ्री इन्स्टालर्ट्स, फ्री पासबुक आणि फ्री ईमेल स्टेटमेंट यासारख्या सुविधा देखील पुरवतात. एक Call आणि प्रॉब्लम Solve! आधार धारकांसाठी UIDAI ने जारी केला टोल फ्री नंबर