नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या. या घोषणांमध्ये अर्थमंत्र्यांनी आयकराबाबतही अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर आकारला जाणार नाही. त्याच वेळी, आता आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्नसाठी आयटीआर फॉर्म देखील अपडेट केला गेला आहे, ज्यामध्ये काही बदल देखील करण्यात आले आहेत.
Pan Card हरवलंय? तर डोंट वरी, सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा परतआयकर रिटर्न
यावेळी आयकर विभागाने 2023-24 च्या मूल्यांकन वर्षासाठी आयकर रिटर्न फॉर्म (ITR 1-6) आणि प्राप्तिकर पडताळणी फॉर्म (ITR V) नोटिफाय केले आहेत. हे फॉर्म आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केलेल्या उत्पन्नाचे रिटर्न भरण्यासाठी वापरले जातील. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. मागील वर्षांच्या तुलनेत, आयकर विभागाने आयटीआर फॉर्म वेळेपूर्वी नोटिफाय केले आहेत. तर, आयटीआर फॉर्ममध्ये काही बदल देखील केले गेले आहेत, ज्याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यावेळी आयटीआर फॉर्ममध्ये काय बदल करण्यात आले आहेत ते जाणून घेऊया.
भरमसाठ परतावा हवाय? ‘या’ स्किम्स आहेत बेस्ट, टॅक्स बेनिफिटचाही मिळेल लाभकेले हे पाच बदल
-तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये क्रिप्टो आणि इतर व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) मधून कोणतीही कमाई केली असल्यास, तुम्हाला नवीन ITR फॉर्ममध्ये दिलेल्या वेगळ्या शेड्यूलमध्ये अशा उत्पन्नाचा रिपोर्ट द्यावा लागेल. -ट्रेडिंग अकाउंटमध्ये आता इंट्रा-डे ट्रेडिंगपासून टर्नओव्हर आणि उत्पन्न खुलासा करण्याचा पर्याय आहे. -आयकर कायद्याच्या कलम 115BAC अंतर्गत नवीन कर प्रणालीची निवड करणार्या व्यक्तींसाठी Disclosure पर्याय देखील जोडला गेला आहे. -करदात्यांना ते परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आहेत की विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आहेत हे क्लिअर करावे लागेल. -ITR 3 आणि ITR 4 मध्ये एक नवीन प्रश्नावली जोडली गेली आहे, ज्यामध्ये मागील वर्षांतील New Tax Regime बद्दल माहिती द्यावी लागेल.
LIC किंवा पोस्ट ऑफिसची पॉलिसी घेण्याचा विचार करताय? कोणती आहे बेस्ट?आयटीआर फॉर्मचे नोटिफिकेशन लवकर येणे एक स्वागतार्ह पाऊल असल्याचे कर तज्ञांचे म्हणणे आहे. कारण यामुळे करदात्यांना त्यांची आवश्यक माहिती तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. यासोबतच, नवीन ITR फॉर्म 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. त्याच वेळी, वैयक्तिक करदाते या वर्षी 31 जुलै 2023 पर्यंत टॅक्स भरु शकतील.