आजही देशातील मोठ्या संख्येने लोक बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणं पसंत करतात. एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करताना, तुम्हाला बँकेत तुमचे पैसे गुंतवण्याचा पीरियड निवडावा लागतो. या पीरियडसाठी तुमचे पैसे लॉक होतात, जे मॅच्योरिटीनंतर इंटरेस्ट रिटर्नसह तुम्हाला मिळतो. SBI मध्ये सहज मिळेल गोल्ड लोन, या सोप्या पद्धतीने ऑनलाइन करा अप्लाय
मात्र अनेकदा अचानक पैशांची गरज भासते. अशा वेळी मॅच्योरिटीपूर्वीच FD तुम्ही मोडू शकता. याला प्रीमॅच्योर एफडी विड्रॉल असं म्हणतात. याला मुदतपूर्व एफडी काढणे म्हणतात. आज आपण सामान्य डेटपूर्वी फिक्स्ड डिपॉझिट मोडल्यास काय दंड लावला जातो याविषयी जाणून घेणार आहोत. घर घेण्याचा प्लान करताय?होम लोनवर महिलांना बंपर सूट देताय 'या' बँका
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणारे ग्राहक गरज पडल्यास मॅच्योरिटीपूर्वीच एफडीमधून पैसे काढू शकतात. मात्र ग्राहकांनी आपत्कालीन परिस्थितीत पैशांच्या गरजेसाठी त्यांची एफडी मॅच्योरिटीपूर्वीच खंडीत केली तर त्यांना दंड म्हणून बँकेला निश्चित रक्कम भरावी लागेल. पारंपारिक एफडीमध्ये, मुदतीपूर्वी काढलेल्या व्याजाच्या रकमेवर सामान्यतः 1% दंड लागू होतो. व्याजाच्या रकमेवर हा दंड आकारला जातो. 1 लाखांच्या FD वर वार्षिक व्याज किती मिळणार? आता झटपट सोडवा हे गणित