जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI मध्ये सहज मिळेल गोल्ड लोन, या सोप्या पद्धतीने ऑनलाइन करा अप्लाय

SBI मध्ये सहज मिळेल गोल्ड लोन, या सोप्या पद्धतीने ऑनलाइन करा अप्लाय

एसबीआय गोल्ड लोनसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

एसबीआय गोल्ड लोनसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील आपल्या ग्राहकांना गोल्ड लोन सुविधा देते. बँकांनी विकलेली सोन्याची नाणी किंवा दागिने तारण ठेवून ग्राहक एसबीआयकडून गोल्ड लोन घेऊ शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 मार्च : अनेकदा आपल्याला आर्थिक गरजांसाठी किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घ्यावे लागते. बँकांकडून विविध कॅटेरिगीमध्ये कर्जेही ग्राहकांना उपलब्ध करून दिली जातात. गोल्ड लोन यापैकी एक आहे. भारतातील गोल्ड लोन सिक्योर्ड लोनच्या कॅटेगिरीमध्ये ठेवले जाते. यामध्ये तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने किंवा नाणी बँकेत ठेवून त्या बदल्यात कर्ज मिळवू शकता. हे कर्ज त्या नाण्यांच्या किंवा दागिन्यांच्या किमतीच्या काही भागाच्या आधारे दिले जाते.

SBI देखील देते गोल्ड लोन सुविधेचा लाभ

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील आपल्या ग्राहकांना गोल्ड लोन सुविधा देते. बँकांनी विकलेली सोन्याची नाणी किंवा दागिने तारण ठेवून ग्राहक एसबीआयकडून गोल्ड लोन घेऊ शकतात. SBI कडून जास्तीत जास्त 50 लाख आणि किमान 20 हजार रुपयांपर्यंतचे सोने कर्ज घेता येते. गोल्ड लोन अंतर्गत सोन्याचे दागिने तारण ठेवावे लागतात. तुम्ही 31 मार्च 2023 पूर्वी सोने खरेदी केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फिस भरावी लागणार नाही.

घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! ‘या’ सरकारी बँकेने कमी केले होम लोनवरील इंटरेस्ट रेट

हे गोल्ड लोन कोण घेऊ शकतं?

SBI कडून हे गोल्ड लोन फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाच मिळू शकते. याशिवाय, सुवर्ण कर्ज अशा लोकांनाच दिले जाते ज्यांच्याकडे उत्पन्नाचा स्थिर स्रोत आहे किंवा ते पेन्शनधारक आहेत. सोने घेतल्याच्या पुढील महिन्यापासून प्रिंसिपल अमाउंट आणि व्याजदराचे पेमेंट सुरू होईल. लिक्विड गोल्ड लोन (ओव्हरड्राफ्ट) मध्ये ओव्हरड्राफ्ट अकाउंटसह ट्रांझेक्शनची सुविधा मिळेल. गोल्ड लोनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला व्याज भरावे लागते. बँकेकडून वेळोवेळी सोन्याचे मूल्यांकनही केले जाते.

गोल्ड लोन घेण्याचा प्लान करताय? या 10 बँका ऑफर करताय सर्वात कमी व्याज

आवश्यक कागदपत्रे

-फोटोग्राफसह गोल्ड लोन अर्ज -पत्त्याच्या पुराव्यासह ओळखपत्र आणि कर्जदार निरक्षर असल्यास साक्षीदार यांचा समावेश आहे. -कर्ज वाटपाच्या वेळी, तुम्हाला डिमांड प्रॉमिसरी नोट (DP) नोट आणि डीपी नोट डिलीवरी लेटर -सोन्याच्या दागिन्यांचे डिलीवरी लेटर -अरेंजमेंट लेटर आणि कर्ज मंजूरीच्या वेळी मिळालेले हार्ड लेटर आवश्यक असेल.

News18लोकमत
News18लोकमत

कसं करता येईल अप्लाय

-गोल्ड लोन अप्लाय करण्यासाठी तुम्ही प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटच्या लोन सेक्शन जाणे आवश्यक आहे. -तेथे तुम्हाला गोल्ड लोन पर्यायावर क्लिक करावे लागेल. -त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. -येथे तुम्हाला SBI Personal Gold Loan या पर्यायावर क्लिक करावे लागेल. -यानंतर तुमच्यासमोर Apply Now चा पर्याय दिसेल. -जिथे क्लिक करून तुम्ही गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: loan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात