कोणत्याही ठिकाणी जर आपल्याला डिस्काउंट मिळत असेल तर एक वेगळाच आनंद मिळतो. IRCTC चं तिकीट खरेदी करताना देखील काही तरी डिस्काउंट मिळावं असं वाटतं. आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला IRCTC चं तिकीट खरेदी करायचं असेल आणि तिकीट खरेदीमध्ये चांगली सूट मिळवायची असेल तर एक खास ट्रिक आज आपण जाणून घेणार आहोत.
ट्रॅव्हल कार्डद्वारे खरेदी करू शकता स्वस्त तिकिट : तुम्ही HDFC बँकेच्या ट्रॅव्हल कार्डद्वारे स्वस्त IRCTC तिकीट खरेदी करू शकता. HDFC बँकेने IRCTC साठी खास कार्ड लॉन्च केलेय. या कार्डद्वारे तुम्हाला IRCTC तिकीट बुकिंगवर 5% सूट मिळेल. Aadhaar Card हरवलंय? चुकीचा वापर होऊ नये म्हणून असं करा लॉक
हे नवीन कार्ड क्रेडिट कार्ड म्हणून काम करेल. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी तुमचे तिकीट बुक करताच, तुम्हाला 5 टक्के कमी पैसे द्यावे लागतील. कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबरी! आता बँक देतेय ही खास सुविधा
होळी येत आहे, त्यामुळे हे ट्रॅव्हल कार्ड तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. होळीच्या दिवशी तुम्ही तिकीट खरेदी करू शकता. नवीन कार्ड RuPay कार्ड नेटवर्कवर काम करेल. या कार्डद्वारे तुम्ही केवळ ट्रेनच नाही तर विमानाचे तिकीटही स्वस्तात खरेदी करू शकता. या कार्डद्वारे तुम्हाला बसपासून हॉटेलपर्यंतच्या बुकिंगमध्ये फायदा मिळेल. 'ही' कामं केली नसतील तर आत्ताच करा! अन्यथा होईल मोठे नुकसान, 31 मार्च आहे डेडलाईन