नवी दिल्ली, 5 मार्च: तुम्ही पब्लिक सेक्टरच्या कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कॅनरा बँक रुपे क्रेडिट कार्ड NPCI समर्थित UPI अॅप्स जसे BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादींवर लाइव्ह झाले आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे कॅनरा बँक रुपे क्रेडिट कार्ड या अॅप्सच्या UPI शी लिंक करू शकता आणि मर्चेंट UPI QR कोड स्कॅन करून कोणत्याही किराणा दुकानांमध्ये किंवा कोणत्याही शॉपमध्ये पेमेंट करू शकता. रुपे क्रेडिट कार्ड नुकतीच रुपे क्रेडिट कार्ड ऑन यूपीआय सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता तुम्ही शेजारच्या दुकानात स्कॅन करून क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकाल. RuPay क्रेडिट कार्डद्वारे, तुम्ही मर्चेंट UPI QR कोड स्कॅन करूनही पेमेंट देऊ शकता. P2P पेमेंट करू शकत नाही. सध्या HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्डधारक त्यांचे कार्ड BHIM, Paytm, PayZapp, Mobikwik, Freecharge इत्यादी UPI अॅप्सशी लिंक करू शकतात.
UPI वरुन किती पैसे पाठवता येतात? SBI, HDFC सह प्रमुख बँकांची लिमिट काय?5 बँकांचे रुपे क्रेडिट BHIM/Paytm/Mobikwik/Freecharge वर लाइव्ह झालेय
BHIM, Paytm, Mobikwik, PayZapp, Freecharge यांसारख्या UPI अॅप्सवर 5 बँकांचे रुपे क्रेडिट कार्ड आता वापरता येते. भविष्यात, तुम्ही तुमचे RuPay क्रेडिट कार्ड इतर UPI अॅप्सशी देखील लिंक करू शकाल. सध्या, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेचे रुपे क्रेडिट कार्डवर ही सुविधा मिळते.
रुपे क्रेडिट कार्ड BHIM अॅपशी कसं लिंक करावं
- सर्वप्रथम BHIM अॅप उघडा.
- यानंतर लिंक केलेल्या बँक अकाउंटवर क्लिक करा.
- आता + वर क्लिक केल्यावर Add Account मध्ये 2 ऑप्शन दिसतात. Bank Account आणि Credit Card.
- क्रेडिट कार्डवर क्लिक केल्यानंतर, संबंधित कार्डवर क्लिक केल्यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक केलेल्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स येतील. (होमपेजवर दिसणार्या बॅनर Rupay Credit Card on UPI वर क्लिक केल्यानंतरही तुम्ही ही प्रक्रिया करु शकता.)
- आता क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि व्हॅलिटिडी टाका.
- यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
- UPI पिन तयार करा. अशा प्रकारे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.
- आता मर्चेंट UPI QR कोड स्कॅन करा आणि रुपे क्रेडिट कार्ड सेलेक्ट करा आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.