बीड, 26 ऑगस्ट : ‘पाच वर्षात एकतर विरोधीपक्ष होताच कुठे हे माहीत नाही. या विरोधीपक्षासारखा बकवास विरोधीपक्ष राजकारणाच्या इतिहासात कधी पहिला नाही’ अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. मोदीजींनी लोकसभेत काँग्रेस मुक्त भारत केला आता विधानसभेत राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करू असा संकल्प पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यांच्या या विधामुळे राजकीय गोटात पुन्हा एकदा ठिणगी पडली अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. महाजनादेश यात्रेच्या आष्टी इथल्या सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, प्राना राम शिंदे, खासदार डॉ प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, माजी मंत्री आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. महाजनादेश यात्राच्या सभेत पुढे बोलतांना पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षाचा खरपूस समाचार घेतला. ‘या विरोधीपक्षाला सत्ते असताना फक्त खाणं माहित होतं. आणि विरोधी भूमिकेत पण यांनी हेच केलं. 15 वर्ष सत्ता असतांना जनतेसाठी काही केलं नाही. आता हे लोक कसल्या यात्रा काढायला लागले आणि भाषण करू लागलेत. जेव्हा तुमच्या हातात सत्ता होती तेव्हा आष्टी पाटोदा शिरूरला का पाणी नाही दिलं. आता कुठल्या तोंडाने येतात असे सवाल’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. इतर बातम्या - रानू यांना प्रसिद्धी पेक्षाही मिळालं मोठं गिफ्ट, 10 वर्षानंतर परतली मुलगी छगन भुजबळांच्या पक्ष प्रवेशावर शिवसैनिकांचा विरोध, पण…! सगळा मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याचा शब्द मुख्यमंञी यांनी दिला. हे काय विरोधीपक्ष बोलतात यांना तोंड नाही बोलायला. सगळे घोटाळे बाज आहेत. दुसऱ्यावर खोटे आरोप करणाऱ्या या विरोधीपक्षावर लोकांचा काडीमात्र विश्वास राहिला नाही. यांनी सभा घेऊ दे, कोणत्या यात्रा काढुदे. या सगळ्या यात्रेच्या तोंडात मारणार आहे. आमची महाजनादेश यात्रा आणि विजयाचा महामेरू रचणार आहे. असा विश्वास पंकजा मुंडेनी व्यक्त केला. तसंच राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करू असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







