छगन भुजबळांच्या पक्ष प्रवेशावर शिवसैनिकांचा विरोध, पण...!

छगन भुजबळांच्या पक्ष प्रवेशावर शिवसैनिकांचा विरोध, पण...!

शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी या विषयावर बोलतांना चुप्पी साधून पक्ष प्रमुख या संदर्भात निर्णय घेतील असं सांगत भुजबळ यांच्या सेनेमधल्या प्रवेशाबाबतच्या विषयाला गुलदस्त्यातच ठेवलं आहे.

  • Share this:

लक्ष्मण घटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 26 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीत भुजबळ नाराज असल्याचंही बोललं जात होतं. पण त्यावर आता शिवसेनेत्या नेत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी या विषयावर बोलतांना चुप्पी साधून पक्ष प्रमुख या संदर्भात निर्णय घेतील असं सांगत भुजबळ यांच्या सेनेमधल्या प्रवेशाबाबतच्या विषयाला गुलदस्त्यातच ठेवलं आहे. सोमवारी नाशिकमध्ये आरोग्य शिबीरादरम्यान महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल चुप्पी साधली आहे.

सध्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा शिवसेनेमधील प्रवेशाबाबतची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुजबळ यांच्या सेनेमधील प्रवेशाची एकच चर्चा आहे. नाशिकमध्ये सेनेचे जेष्ठ नेते मंत्री दादा भुसे यांच्या उपसस्थितीमध्ये नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आयोजित मोफत वैद्यकीय आणि दंत महाआरोग्य शिबीराच्या उदघाटन सोहळा संपन्न झाला.

सोमवारी नाशिकमध्ये आरोग्य शिबीरादरम्यान महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री दादाजी भूसे यांना भुजबळ यांच्या शिवसेनेमधल्या प्रवेशाबाबत विचारलं असता याबाबत त्यांनी बोलतांना सदर विषयावर वरिष्ठ पातळीवर निर्णय केला जाईल आणि पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे या संदर्भांत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भुसे यांनी दिली आहे.

दरम्यान, पक्ष प्रमुखांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे आमचं आणि प्रत्येक शिवसैनिकांचं काम असल्याचंदेखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. या विषयाबाबत भुजबळ यांनीदेखील आपण राष्ट्रवादीमधेच राहणार असल्याचं बोलल होतं. ते भुजबळ दुसरे भुजबळ असेल असं देखील त्यांनी म्हटलं होतं.

इतर बातम्या - रानू यांना प्रसिद्धी पेक्षाही मिळालं मोठं गिफ्ट, 10 वर्षानंतर परतली मुलगी

मात्र, नाशिकमधल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं उद्धव ठाकरे यांची भेट घेत भुजबळ यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाला विरोध दर्शविल्याची देखील चर्चा सध्या नाशिकमध्ये आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळ हे भुजबळ यांच्या सेना प्रवेशांच्याच चर्चेन रंगल्याच चित्र आहे.

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलले छगन भुजबळ, म्हणाले...

इतर बातम्या - धक्कादायक! असं काही झालं की जावायाने चक्क सासूचं नाक चावलं, चाकूने कान कापला

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. पण आता या सर्व चर्चांचं स्वत: छगन भुजबळ यांनी खंडन केलं असून मी शिवसेनेत जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

'मी मांजरपाडा जलपूजन करतोय म्हणून त्यावरून लक्ष वळवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. ही एक राजकीय खेळी आहे. यावर मी योग्य वेळी बोलेल. पण या प्रकारच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत,' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नंदूरबारमध्ये धावत्या रेल्वेवर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक LIVE VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 26, 2019, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading