मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापुरातून कोरोनाची धक्कादायक बातमी, 'ती' एक महिला ठरली 10 जणांसाठी घातक

सोलापुरातून कोरोनाची धक्कादायक बातमी, 'ती' एक महिला ठरली 10 जणांसाठी घातक

 सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे.

सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे.

सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे.

सोलापूर, 16 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोलापूरमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. एका महिलेमुळे तब्बल 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात आज आणखी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे.

हेही वाचा -काही जोकरांमुळे कोरोना पसरतोय, पोलीस-डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर भडकला भाईजान

रविवारी एका किराणा दुकानदाराचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी काढण्यात आला होती. त्यानुसार तपासणी केली असता एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली. या महिलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर आज याच महिलेच्या संपर्कात आलेल्या 42 जणांची चाचणी करण्यात आली.  त्यापैकी 10 जणांची टेस्ट आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

हेही वाचा - Appleचा सर्वात स्वस्त iPhone SE 2020 लॉन्च, वाचा काय आहे किंमत आणि फीचर्स

मात्र, असं असलं तरी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री मात्र अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला कसा हा यक्षप्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3081 वर

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत असून आता राज्यातील कोरोनाग्रस्तांनी 3 हजाराचा टप्पा पार केला आहे. तसंच मुंबईतही कोरोनाचे नवे 107 रुग्ण समोर आले आहेत.  आतापर्यंत महाराष्ट्रातील 3 हजार 81 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये नव्या 165 रुग्णांचा समावेश आहे.   तर यामध्ये मुंबईतील को15 पोलिसांचाही समावेश आहे.  मुंबईत मागील 24 तासांमध्ये 5 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 15 वर गेली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Corona, Solapur