मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रामायणातील लव-कुश सध्या काय करतात? एक तर आहे प्रसिद्ध अभिनेता

रामायणातील लव-कुश सध्या काय करतात? एक तर आहे प्रसिद्ध अभिनेता

रामायणात त्यावेळी सुद्धा लव-कुश यांची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांची खूप चर्चा झाली होती. या भूमिका दोन मराठी मुलांनी साकारल्या होत्या.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 16 एप्रिल : रामानंद सागर यांचा लोकप्रिय शो रामायण सध्या री-टेलिकास्ट होत आहे. या मालिकेनं पुन्हा एका इतिहास रचला आहे. सध्या टीआरपी रेटिंगमध्ये ही मालिका अव्वल आहे. सध्या सगळीकडेच रामायणची चर्चा आहे आणि यासोबतच सध्या ते कलाकाराही अचानक लाइम लाइटमध्ये आले आहेत जे सध्याच्या ग्लॅमरमध्ये हरवून गेले होते. रामायणातील बाकी भूमिकांप्रमाणेच सध्या यामध्ये लव-कुश यांची भूमिका साकारणाऱ्या बालकारांचीही सध्या बरीच चर्चा आहे.

रामायणात त्यावेळी सुद्धा लव-कुश यांची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांची खूप चर्चा झाली होती. या भूमिका दोन मराठी मुलांनी साकारल्या होत्या. त्यामुळे सध्या हे दोघंही काय करतात असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. पण तुम्हाला विश्वास नाही बसणार, यापैकी एक तर आता प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. तर दुसरा एका प्रसिद्ध कंपनीचा CEO आहे.

मिस इंडिया ग्रँड फिनालेसाठी नव्हते कपडे, सुश्मितानं सांगितली विनिंग गाऊनची कहाणी

लव-कुश यांच्या भूमिका त्यावेळी स्वप्नील जोशी आणि मयुरेश क्षेत्रमाडे यांनी साकारल्या होत्या. लवची भूमिका साकारणार स्वप्नील जोशी आज मराठी इंड्स्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानं मितवा, दुनियादारी यासारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली त्याची समांतर ही वेब सीरिज सुद्ध प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली होती.

रामायणात कुशची भूमिका साकारणारा मयुरेश सध्या परदेशात राहतो. मयुरेश सध्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये CEO पदावर कार्यरत आहे. मयुरेश एक चांगला लेखक सुद्धा आहे. काही विदेशी लेखकांसोबत मिळून मयुरेशनं स्पाइस अँड डेव्हलपमेंट नावाचं एक पुस्तक सुद्धा लिहिलं आहे.

(संपादन : मेघा जेठे.)

लारा दत्तानं पती महेश भूपतीची अनेक वर्षांची मेहनत घालवली होती 'पाण्यात'

'जबन छोरी'मध्ये दिसला सपना चौधरीचा BOLD अंदाज, तुफान फिरतोय VIDEO

First published:

Tags: Ramayana