जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / वसईत धक्कादायक घटना, मंदिराच्या पुजाऱ्याला तरुणांची मारहाण

वसईत धक्कादायक घटना, मंदिराच्या पुजाऱ्याला तरुणांची मारहाण

वसईत धक्कादायक घटना, मंदिराच्या पुजाऱ्याला तरुणांची मारहाण

वसई येथील जागृत महादेव मंदिरात शंकरानंद दयानंद सरस्वती हे पुजारीचे काम करत असून शामसिंग सोमसिंग ठाकूर या सहकाऱ्यासह तेथेच वास्तव्यास आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

विरार, 30 मे : पालघरमध्ये दोन साधूसह ड्रायव्हरची जमावाने चोर समजून हत्या केल्यामुळे देशभरात पडसाद उमटले होते. वसईमध्येही दोन दिवसांपूर्वी एका मंदिराच्या पुजाऱ्याला तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. वसई तालुक्यातील भालिवली येथील महामार्गाच्या कडेला असलेल्या डोंगर दऱ्यात उंचीवर असलेल्या शिव मंदिराच्या पुजाऱ्याला  २७  मेच्या रात्री 2-3 तरुणांनी मारहाण केल्याची  तक्रार विरार पोलिसांत दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे . **हेही वाचा -** जमीन सपाटीकरण करत असताना अचानक फुटले मडके, शेतकऱ्याच्या हाती लागले घबाड वसई येथील जागृत महादेव मंदिरात शंकरानंद दयानंद सरस्वती हे पुजारीचे काम करत असून शामसिंग सोमसिंग ठाकूर या सहकाऱ्यासह तेथेच वास्तव्यास आहेत. 27 मे च्या रात्री ते सर्व कामकाज आटोपून मंदिराबाहेरील व्हरांड्यात झोपलेले असताना रात्री एकच्या सुमारास त्यांना  कुत्र्याच्या भुंकण्यामुळे जाग आली.  कुत्रा भुंकत असलेल्या दिशेकडे जाऊन पाहिले असता आंब्याच्या झाडामागे कुणी तरी दबा धरून दिसल्याने आढळून आले. पुजाऱ्याने या तरुणांना हटकले असता दबा धरून बसलेल्या तरुणांनी मंदिराच्या पुजाऱ्याला आणि सहकाऱ्याला मारहाण करून दान पेटीतील रक्कम व काही सामान  घेऊन पोबारा केला. **हेही वाचा -** आग्रामध्ये 3 जणांचा मृत्यू 25 जखमी, ताजमहलाच्या मुख्य कब्रचं रेलिंगही तुटलं मात्र, याच वेळेस पुजाऱ्याने खानिवडे गावात फोन केला व नागरिकांना बोलावले. त्यावेळी एक आरोपी त्यांच्या हाती लागला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात