जमीन सपाटीकरण करत असताना अचानक फुटले मडके, शेतकऱ्याच्या हाती लागले घबाड

जमीन सपाटीकरण करत असताना अचानक फुटले मडके, शेतकऱ्याच्या हाती लागले घबाड

विनायक पाटील हे जेसीबीच्या मदतीने आपल्या जमिनीचे सपाटीकरण करत होते. जमिनीचे सपाटीकरण सुरू असताना अचानक काही तरी फुटण्याचा आवाज आला.

  • Share this:

 कोल्हापूर, 30 मे : शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या सहायाने शेत जमिनीचे सपाटीकरण करीत असताना 716 नाण्यांचे गुप्तधन सापडले. उपकोषागार अधिकाऱ्यांकडे सुरक्षा कक्षामध्ये ही नाणी ठेवली असून पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी याबाबत पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती शाहूवाडीचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी दिली.

जमीन मालक विनायक बापुसो पाटील हे गट क्र. 186 आपल्या शेत जमिनीमध्ये 25 मे पासून विकास पाटील, उत्तम पाटील यांच्या समवेत जेसीबीच्या सहायाने  जमिनीचे सपाटीकरण करत होते. जमिनीचे सपाटीकरण सुरू असताना अचानक काही तरी फुटण्याचा आवाज आला. त्यानंतर पाटील यांनी काय फुटले हे पाहण्यासाठी पोहोचले असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. यावेळी जमिनीत असणारे मडके फुटून आतमधील असणारी नाणी सापडली. आपल्या शेतात गुप्तधन होते हे कळाल्यावर पाटील यांना धक्काच बसला. त्यानंतर सापडलेली नाणी पाटील यांनी शेतामधील घरात असणाऱ्या लोखंडी कपाटात नायलॉन पोत्यामध्ये आणि टीशर्टमध्ये मातीच्या मडक्याचे तुटलेले तुकडे ठेवले होते.

हेही वाचा -‘एन्काउंटर’मध्ये जखमी झाला माओवादी, जीव वाचविण्यासाठी जवानांनी दिलं रक्त!

याबाबत पाटील यांनी  सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची कार्यालयात समक्ष भेट घेवून त्यांना सापडलेल्या गुप्तधनाबाबत माहिती दिली.  त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दिलेल्या आदेशानुसार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, करंजफेणचे मंडळ अधिकारी, अणुस्कुराचे तलाठी, तीन पंच आणि जमीनमालक यांच्या समवेत पहाटे 3 वाजेपर्यंत  गुप्तधन सापडलेल्या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा केला आणि नाणी ताब्यात घेतली.

सापडलेले गुप्तधन व मातीचे तुटलेले तुकडे याची मोजमाप करण्यात आली. त्यामध्ये अंदाजे 2 सें.मी. व्यासाची व 2 मि.मी. जाड अशी एकूण 716 नाणी आणि मडक्याचे 19 तुकडे असल्याचे दिसून आले. हे गुप्तधन लोखंडी पेटीमध्ये सिलबंद करण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असून, सापडलेले मडके आणि नाणी यांचे आयुष्यमान व कालावधी कार्बन डेटींगच्या माध्यमातून करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी दिले आहेत. (संग्रहित फोटो)

हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जनतेला पत्र, वर्षपूर्तीनिमित्तानं साधला संवाद

संपादन - सचिन साळवे

First published: May 30, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading