वादळाचा कहर! आग्रामध्ये 3 जणांचा मृत्यू 25 जखमी, ताजमहलाच्या मुख्य कब्रचं रेलिंगही तुटलं

वादळाचा कहर! आग्रामध्ये 3 जणांचा मृत्यू 25 जखमी, ताजमहलाच्या मुख्य कब्रचं रेलिंगही तुटलं

  • Share this:

आगरा, 30 मे : उत्तर प्रदेशातील आग्रा इथे झालेल्या वादळाने बरचं नुकसान केलं आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब, झाडं, घरं नष्ट झाल्याची माहिती आहे. या वादळात 3 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 25 लोक जखमी आहेत. दुसरीकडे, ताजमहाललाही या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. या वादळात ताजमहालच्या (Taj Mahal) मुख्य कबरची संगमरवरी रेलिंग तुटली आहे. चमेली मजल्यावरील लाल वाळूच्या दगडाचे रेलिंगही तुटलं आहे. या प्रकरणात स्मारकाच्या नुकसानीची माहिती उच्च अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.

आग्रामध्ये ताशी सुमारे 124 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे जीवितहानी व मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या वादळामुळे 3 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये डुकी, फतेहाबाद, सदर येथील रहिवासी आहेत. अवघ्या 35 मिनिटात जोरदार गडगडाटीसह शेकडो झाडे उन्मळून पडली.

200 पेक्षा जास्त झाडं पडली

मिळालेल्या माहितीनुसार, वादळानंतर गारपीट व मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील अनेक घरांचं नुकसान झालं. काहींची पडझड झाली. संपूर्ण जिल्ह्यात 200 हून अधिक झाडं पडली आहेत. त्याच वेळी प्राणी आणि पक्ष्यांनाही खूप त्रास सहन करावा लागला. सर्वाधिक नुकसान आग्रा-जयपूर महामार्गावर झालं. डझनभर झाडं रस्त्यावर पडली आहेत. त्याचबरोबर शहरातील शहागंजच्या जयपूर घराचंही नुकसान झालं आहे.

ड्रोनद्वारे केली जाणार औषधांची घरपोच डिलिव्हरी, स्पाइसजेट सुरू करतंय ही खास सेवा

मृतांमध्ये 6 वर्षाची मुलगी

पोलीस स्टेशन सदर भागातील नगला कर्मवीरमध्ये दोन घरे कोसळली असून त्यात जयवीर नावाच्या व्यक्तीची 6 वर्षांची मुलगी मरण पावली. त्याचवेळी, घर कोसळल्याने संपूर्ण कुटुंब जखमी आहे. याखेरीज डौकी भागातील 60 वर्षीय कैलाशी आणि फतेहाबादमध्ये 50 वर्षीय रामशंकर यांच्या मृत्यूची बातमी आहे.

ताजमहालला दोन वर्षांत तीनदा झालं नुकसान

यापूर्वी, 2018 मध्ये दोन खांब आणि दगड ताजमहालमध्ये दोनदा पडले होते. 11 एप्रिल आणि 2 मे रोजी 2018 मध्ये रॉयल गेट, दक्षिण गेटचा उत्तर-पश्चिम पुष्पगुच्छ कोसळला होता. सरहिंदी बेगम आणि फतेहपुरी बेगम यांच्या कब्रवर पुष्पगुच्छ खांब पडले होते.

शाळा जूनला नाहीतर या तारखेला होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

First published: May 30, 2020, 8:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या