अमरावती, 10 जुलै : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अमरावतीमध्ये बोलताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपात गेलेले गोमूत्र शिंपडून शूद्ध झाले आहेत. भाजपात गेलेल्यांची चौकशी का थांबवली असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे जे बोगस बियाणं होतं ते सर्व गेलं. आता आम्ही जमीन पुन्हा नांगरू. भाजपात गेलेल्यांची चौकशी का थांबवली? भाजपात गेलेले गोमूत्र शिंपडून शूद्ध झाले. मी आजारी असताना रात्रीच्या गाठीभेटी घेऊन सरकार पाडलं. आज तीन तोंड झाली उद्या दहा तोंड होतील असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी सत्तेत नसतानाही जनतेचं माझ्यावर प्रेम आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे निष्ठावंत कोणाचं ओझं वाहत आहेत. भाजपच्या निष्ठावतांचं कुपोषण सुरू आहे आणि नको त्यांना सत्तेचा ढेकर आलाय. माझ्याकडे पक्ष नाहीये, चिन्ह पण नाहीये पण मला भाजपची भीती वाटत नाही. मात्र भाजपला माझी भीती वाटते असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.