मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज

माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज

मी साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो, पण याच्यासाठीच मी हट्टहास केला नाही, हा योगायोग आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी  देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मी साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो, पण याच्यासाठीच मी हट्टहास केला नाही, हा योगायोग आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मी साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो, पण याच्यासाठीच मी हट्टहास केला नाही, हा योगायोग आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मुंबई, 24 जुलै : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपला विरोधीबाकावर बसावं लागलं. ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजप नेते वारंवार जाहीरपणे विधान करत आहे. तर 'माझी मुलाखत सुरू असताना आमचं सरकार पाडून दाखवा' असं थेट आव्हानचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखतीनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत उद्या सामनामध्ये प्रसिद्ध होणार आहे. आज या मुलाखतीचा तिसरा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. अखेरच्या या प्रोमोत उद्धव ठाकरे यांनी सरकारभोवती फिरणाऱ्या अनेक प्रश्नांची अचूक उत्तर देत भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे.

'शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे या सरकारचे भवितव्य काय असेल असं विचारलं जातंय, पण सरकारचे भवितव्य हे विरोधी पक्षावर अवलंबून नाही' असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

भाजपकडून वारंवार सरकार पाडण्याच्या धमक्या दिल्या जातात. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये ऑपरेशन कमळ चालवले गेले. पण, महाराष्ट्रात मी इथं बसलो आहे. माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले.

तसंच, कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शासकीय-प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. अशा परिस्थितीत यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. अतातायीपणा नसला पाहिजे. मी साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो, पण याच्यासाठीच मी हट्टहास केला नाही, हा योगायोग आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी  देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, महत्त्वाच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलल्या

आम्हाला तीनचाकी सरकार म्हटलं जात आहे. मग केंद्रामध्ये किती चाकं आहे, जे देशाचा कारभार पाहत आहे.  आता तुम्हाला चीन नको आहे, पण येणाऱ्या काळात हिंदी चिनी भाई-भाई होणार नाही का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थितीत केला.

तर याआधीच्या प्रोमोमध्ये  'लॉकडाउन आहेच, एक एक गोष्ट आपण सोडवत चाललो आहे, मी काही ट्रम्प नाही, जी आपली माणसं तडफडताना पाहू शकेल' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.  येत्या 25 आणि 26 जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Shivsena, Uddhav Thackery