मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सचिन वाझे प्रकरण : शरद पवारांच्या भेटीनंतर राऊतांनी दिली तिरकस प्रतिक्रिया

सचिन वाझे प्रकरण : शरद पवारांच्या भेटीनंतर राऊतांनी दिली तिरकस प्रतिक्रिया

kunal kamra invites sanjay raut on his podcast

kunal kamra invites sanjay raut on his podcast

महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) सचिन वाझे प्रकरणात शिवसेनेवर दबाब आणत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 मार्च : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर सचिन वाझे (Sachin Vaze) अटक प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सरकारला घेरलं आहे. या प्रकरणात दररोज नवं नवीन खुलासे होतं आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्येच मतंमतांतरे पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) सचिन वाझे प्रकरणात शिवसेनेवर दबाब आणत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

त्यामुळे राज्यातील पोलीस विभागात (Maharashtra Police) मोठ्या प्रमाणात आदला बदल होतील अशी चर्चा सुरू सुरू आहे. या प्रकरणात सबळ पुरावे आढळत असल्यास मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) किंवा संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बदल्या कराव्यात अशी भूमिका काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे  शिवसेनेवर एकप्रकारे दबाव टाकत असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारची बदनामी थांबवण्यासाठी मनसुख हिरेन प्रकरणात जर कोणी दोषी आढळत असेल, त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात काय हरकत आहे, अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

एकंदरीत राज्यातलं चित्र असं असताना,  शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र याबाबत आता संजय राऊतांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, शरद पवार नाराज आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरून अजिबात वाटलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे बदल होतील, असं मला वाटत नाही.

हे  ही वाचा -..तर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली का करू नये,काँग्रेस-राष्ट्रवादीचा सेनेवर दबाव?

मी एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. कोणत्याही प्रश्नावर चिंतन करूनच पवार साहेब निर्णय घेतात. यापूर्वीही पवार साहेबांनी अनेक गोष्टी समजून घेतल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने शरद पवारांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली नाही. यावेळी त्यांना पोलीस आयुक्तांच्या बदल्या विषयी विचारलं असता ते म्हणाले की, 'पोलीस आयुक्तांच्या बदल्याबाबत मी कसं सांगणार? सरकार चालवणारे नेते वेगळे आहेत.

First published:

Tags: Sanjay raut, Sharad pawar, Shivsena