मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /...तर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली का करू नये, काँग्रेस-राष्ट्रवादीचा सेनेवर दबाव? 

...तर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली का करू नये, काँग्रेस-राष्ट्रवादीचा सेनेवर दबाव? 

 या प्रकरणामध्ये मुंबईतील काही मोठे अधिकारी तसंच राजकीय नेते अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणामध्ये मुंबईतील काही मोठे अधिकारी तसंच राजकीय नेते अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणामध्ये मुंबईतील काही मोठे अधिकारी तसंच राजकीय नेते अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई, 16 मार्च : सचिन वाझे (Sachin Vaze) अटक प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागामध्ये (Maharashtra Police) मोठ्या प्रमाणात आदला बदल होतील अशी चर्चा सुरू सुरू आहे. अशातच काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी या प्रकरणात सबळ पुरावे आढळत असल्यास मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) किंवा संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ हलवण्यासाठी शिवसेनेवर दबाब टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. जर प्रकरणात दोषी आढळत असल्यास सरकारची बदनामी थांबवण्यासाठी तात्काळ पदावरून हलवण्यात काय हरकत आहे, अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

फडणवीसांनी आणखी एका मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरलं, विचारला आक्रमक सवाल

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए संस्था आता मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करणार आहे. यापुढे या प्रकरणांमध्ये मुंबईतील काही मोठे अधिकारी तसंच राजकीय नेते अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे याच प्रकरणावरून विरोधकांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राजीनाम्याची मागणी केल्याचं आता दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारची कोंडी होत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आज बैठक झाली.

या बैठकीच्या दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी या प्रकरणांमध्ये जर सबळ पुरावे आढळत असतील तर संबंधित अधिकारी भलेही मुंबई पोलीस आयुक्त  असतील किंवा त्यापेक्षा अजून कोण अधिकारी असतील त्यांची आपण बदली करण्याची भूमिका घ्यायला काय हरकत आहे, अशी भूमिका मांडल्याचे समजते.

अश्विन म्हणतो, 'मला पंतने निराश केलं, मी एकटा दोषी नाही'

महाविकास आघाडी सरकारची बदनामी वाचण्यासाठी अशा स्वरूपाची भूमिका घ्यायला काय हरकत आहे, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणांमध्ये दोषी नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचे संकेत देखील या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्याचे समजते. एकूणच वाझे यांच्या अटकेनंतर या प्रकरणांमध्ये मुंबईतील वरिष्ठ आयपीएस अधिकारी देखील पुढच्या कालावधीमध्ये अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बदलीसाठी दबाव वाढवण्याच काम सुरू केल्याचे समजते.

First published:
top videos

    Tags: Congress, Mumbai police, Shivsena