मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'पाणी दा रंग वेख के', गिटार वाजवता वाजवता तरुण पडला गटारात, पाहा हा VIDEO

'पाणी दा रंग वेख के', गिटार वाजवता वाजवता तरुण पडला गटारात, पाहा हा VIDEO

 पावसाळा सुरू झाल्याने पावसासोबत संगिताचा आनंद घेण्यासाठी एक तरुण कल्याण पूर्वेतील एका नाल्याच्या कठाड्यावर बसला होता.

पावसाळा सुरू झाल्याने पावसासोबत संगिताचा आनंद घेण्यासाठी एक तरुण कल्याण पूर्वेतील एका नाल्याच्या कठाड्यावर बसला होता.

पावसाळा सुरू झाल्याने पावसासोबत संगिताचा आनंद घेण्यासाठी एक तरुण कल्याण पूर्वेतील एका नाल्याच्या कठाड्यावर बसला होता.

कल्याण, 18 जून :   चिंता, थकवा, काळजी दूर करण्यासाठी संगीत ही एक अगदी परिणामकारक उपचारपद्धती आहे म्हणून गाणी ऐकली पाहिजे. पण, कल्याण परिसरामध्ये गिटार वाजवताना एक तरुण इतका दंग झाला की, तो थेट नाल्यातच पडला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन या 'सूरसम्राट' तरुणाला बाहेर काढलं.

कल्याण पूर्वे भागातील लोकग्राम परिसरात दुपारी ही घटना घडली आहे.  राज्यात कोरोनान थैमान घातले असताना उद्योग धंदे अनेक ठिकाणी बंद आहेत. पावसाळा सुरू झाल्याने पावसासोबत संगिताचा आनंद घेण्यासाठी एक तरुण कल्याण पूर्वेतील एका नाल्याच्या कठाड्यावर बसला होता. मात्र, संगीत ऐकता ऐकता या तरुणाचा तोल गेला आणि तो थेट नाल्यात पडला होता. नाल्यात तरुण गिटारासह पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

स्थानिकांनी आधी या तरुणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, गटारात पडल्यामुळे हा तरुण पूर्णपणे भरला होता. त्यामुळे त्याला मदत करण्यास फार कुणी पुढे येण्यास तयार नव्हते. अखेर स्थानिकांनी नाल्यात तरुण पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.

त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना कारण समजले तेव्हा त्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले. अखेर नाल्यात सीडी टाकण्यात आली आणि तरुणाला दोरीने बांधण्यात आले. त्यानंतर या तरुणाला नाल्यातून बाहेर काढण्यात आले.

नाशिक पालिकेच्या ऑनलाईन महासभेत विरोधकांचा राडा, कारण असे की...

तरुणाला गिटारासह बाहेर काढण्यात आले आणि रस्त्यावरच अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणावर पाण्याचा मारा केला. नाल्यात तरुण पडल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. जवानांनी सुखरूप बाहेर काढल्यानंतर या तरुणाने चुपचाप आपल्या घराचा मार्ग धरला.

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Kalyan, KDMC