नाशिक पालिकेच्या ऑनलाईन महासभेत विरोधकांचा राडा, कारण असे की...

नाशिक पालिकेच्या ऑनलाईन महासभेत विरोधकांचा राडा, कारण असे की...

त्यामुळेच विरोधकांनी आजची महासभा रद्द करण्याची मागणी करत आयुक्तांच्या दालनात धडक दिली.

  • Share this:

नाशिक, 18 जून : नाशिक महानगर पालिकेची महासभा आणि गोंधळ हे तशी नित्याची बाब मात्र, यंदाचा गोंधळ एखाद्या विकासकामाच्या विषयाहून झाला नाही तर हा गोंधळ झाला तो तांत्रिक अडचणीमुळे.

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाउन लागू करण्यात आला. मंत्रालय आणि स्थानिक पातळीवर  चर्चा आणि बैठकीसाठी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सची मदत घेतली जात आहे. आज नाशिक महापालिकेची सभा पार पडली. ही सभा ऑनलाईन घेण्यात आली होती.

ऑनलाईन पद्धतीने बोलाविण्या आलेल्या या महासभेत तांत्रिक अडचणीमुळे ही महासभा होती की, एखाद्या बाजारातला गोंधळ असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यामुळेच विरोधकांनी आजची महासभा रद्द करण्याची मागणी करत आयुक्तांच्या दालनात धडक दिली.

पुण्यात कोरोनाचा कहर! नवे हॉटस्पॉट आले समोर, आठवडाभरात आढळले 360 च्यावर रुग्ण

ऑनलाईन घेण्यात आलेल्या या सभेत तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे एकमेकांशी बोलण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळेच विरोधकांनी यावर आक्षेप घेतला.

ऑनलाईन महासभेत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर कुणीच दिसत नाही आणि कुणाचा आवाजही येत नाही. त्यामुळे नेमकं बोलायचं तरी काय? असा सवाल विरोधकांनी उपस्थितीत केला.

टास्क पूर्ण नाही झाला म्हणून 20 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी आयुक्ताच्या दालनाकडे धाव घेतली आणि गोंधळ घातला. विरोधकांनी घातलेल्या या राड्यानंतर ही महासभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली.

 संपादन - सचिन साळवे

First published: June 18, 2020, 2:23 PM IST

ताज्या बातम्या