मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना 3 दिवसांत मागितला चौकशी अहवाल

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना 3 दिवसांत मागितला चौकशी अहवाल

सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली.

सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली.

सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली.

    नवी दिल्ली, 5 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) कडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.  केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI कडे दिली जाणार आहे. याबाबत केंद्र सरकार लवकरच अधीसूचना काढणार आहे. हेही वाचा...‘सुशांतच्या अकाऊंटमधून काढले 50 कोटी, मुंबई पोलिसांनी याकडे का केलं दुर्लक्ष' दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. बिहारमध्ये नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये रियाविरुद्ध गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल. विकास‌ सिंहने मुंबई पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. त्यात बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी कायम ठेवण्याचीही कोर्टाकडे परवानगी मागितली आहे.  कोर्टाने दोन्ही पक्षांचं म्हणनं नोंदवून घेतलं आहे. या प्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.  त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करणार की CBI याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनावणी दरम्यान, तुषार मेहता यांनी सांगितलं की, रियानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेला आता काही अर्थ नाही. रियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून बिहारमधील खटला मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. मात्र, बिहारमध्ये चौकशी होणार नाही कारण, बिहारने आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. दुसरीकडे, रियाचे वकील श्याम दीवान यांनी बिहारमधील खटला मुंबई ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून त्यांनी आतापर्यंत 56 जणांची चौकशी केली आहे. हेही वाचा...राम मंदिर भूमिपूजनावरून औरंगाबादेत गोंधळ, परवानगी नसताना भाजपनं काढली जल्लोष रॅली रियाच्या वकीलांनी कोर्टात सांगितलं की, रियानं  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी बिहार पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, असं रियानं आपल्या याचिकेल म्हटलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Mumbai police, Sushant sing rajput, Sushant Singh Rajpoot

    पुढील बातम्या