मुंबई, 4 ऑगस्ट : सुशांतसिंह राजपूत प्रकरणादरम्यान मुंबई आणि बिहार पोलिसांमधील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. सुशांतच्या वडिलांनी काल एक व्हिडीओमुळे आणखी एका मुद्द्यावरुन चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारीमध्येच त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुशांतच्या सुरक्षेबाबत तक्रार केल्याचे त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटले आहे. त्यानंतर आता बिहारचे डीजीपी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी मुंबई पोलिसांसमोर एक प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या 4 वर्षांत सुशांतच्या अकाऊंटमधून तब्बल 50 कोटी रुपये आले आणि आश्चर्य म्हणजे हे पैसे काढण्यात आले. एका वर्षांत त्याच्या अकाऊंटमध्ये 17 कोटी रुपये आले आणि त्यातून 15 कोटी रुपये काढण्यात आले. यावर चौकशी होणं गरजेचं नव्हतं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांना दाबण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पांडेय यांची ओळख निर्भीड आणि स्पष्टवक्ता अधिकारी अशी ओळख आहे. हे वाचा- ‘औक्षणाचं ताट सजवून ठेवलंय गुलशन’; सुशांतची बहीण नीतू सिंहची भावूक पोस्ट रविवारी बिहार पोलिसांच्या टीमला लीड करण्यासाठी एसपी विनय तिवारी मुंबई पोहोचले. मात्र त्यांना पालिकेने क्वारंटाइन केलं. यानंतर मोठी चर्चा सुरू होती. यावर बिहार पोलिसांनी नाराजी व्यक्त केली. सुशांत सिंहच्या प्रकरणातील कोणताही रिपोर्ट दिला जात नसल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला असून अशा प्रकारचा असहयोग आम्ही कोणत्याही राज्यात पाहिला नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.