औरंगाबाद, 5 ऑगस्ट: अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऐतिहासिक राम मंदिरांचं भूमिपूजन होत आहे. संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मनाईनंतरही औरंगाबाद शहरात भाजपनं जल्लोष रॅली काढली आहे. त्यामुळे प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.
हेही वाचा...राममंदिर भूमिपूजन: पिंपरी-चिंचवडमध्ये वाटणार 10 लाख लाडू; भाजप आमदारांना नोटीस
भाजपच्या जल्लोष रॅलीत शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. गजानन महाराज मंदिर चौकात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी भाजप कार्यकार्ये आणि आमदारांना घरी पाठवून दिले आहे.
सामूहिक जल्लोषास परवानगी नाही...
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त अयोध्येला जात आली नाही तरी आपापल्या घरीच दिवे लावून किंवा मंदिर, गुरुद्वारावर रोषणाई करावी. नागरिकांनी मंदिरातही प्रत्येकी एक दिवा लावावा,असे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग, दल, भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे.
राम मंदिर भूमिपूजनावरून औरंगाबादेत गोंधळ....#RamMandir #RamMandirAyodhya pic.twitter.com/Gs5J6XtjQT
— News18Lokmat (@News18lokmat) August 5, 2020
बुधवारी प्रत्येकाने घरासमोर रांगोळी काढावी, भगवा ध्वज लावावा. रामरक्षा स्तोत्र म्हणावे, ‘जय जय श्रीराम’ विजय मंत्राचा घोष करावा. श्रीरामाची आरती करून प्रसादाचे वाटप करावे. सायंकाळी तुळशी वृंदावनाजवळ पाच दिवे लावावेत. जवळच्या मंदिरात जाऊन शक्य असेल तर आरती करावी. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कही लावावा, असं आवाहन विहिंपचे महानगर अध्यक्ष डॉ. जीवनसिंग राजपूत, महानगर मंत्री शैलेश पत्की यांनी केलं आहे.
महाराष्ट्र करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष देविचंदसिंह बारवाल म्हणाले, ‘घरोघरी गुढी उभारून, जय श्रीराम नावाची रांगोळी काढावी. रात्री दिवे लावावेत. घरात बसून टीव्हीवर हा साेहळा पाहून उत्सवात आपण सहभागी व्हावे.’
हेही वाचा...
पोलिसांचा मोठा फौजफाटा..
शहरात 3 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहे. शहरात 60 ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. मुख्य चौकात नाकेबंदी केली जाईल. राज्य राखीव दलाची एक तुकडी मागवण्यात आली आहे. मिश्र वस्तीत अधिक लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. मंगळवारी रात्रीपासून सर्वच धार्मिक स्थळांत भागात गस्त घालण्यात येत आहे.