हाथरस, 07 ऑक्टोबर : हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras Gang Rape) प्रकरणानं सर्व देशाला हादरून सोडले आहे. एकीकडे चारही आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी देशभरात मोर्चे निघत असताना भाजप नेते रणजित बहादूर श्रीवास्तव यांनी सर्वांसमोर हाथरस प्रकरणातील आरोपींची बाजू घेतली आहे.
कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे रणजित श्रीवास्तव चर्चेत असतात. श्रीवास्तव हे स्वत: गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आहेत. श्रीवास्तव यांचा एका व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये श्रीवास्तव आरोपींची बाजू घेताना दिसत आहेत.
रणजित बहादूर यांनी या प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ निवेदनात हाथरस प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचे म्हणत पीडित मुलीवर लाजिरवाणे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, "अशा कितीतरी मुली मरतात, अशा मुली काही ठिकाणी सापडतात. या मुली ऊसाच्या शेतातच का सापडतात, धान्याच्या शेतात सापडतात, जंगलात सापडतात, बाजरीच्या शेतात सापडतात, गटारा, झुडुपात सापडतात मात्र गव्हाच्या शेतात का नाही सापडत? यांच्या मरणाची जागाच ती आहे. कोणीही त्यांना ओढून घेऊन जाताना पाहिले नाही. या घटना अशाच जागी का घडतात. संपूर्ण देशपातळीवर ही बाब म्हणजे तपासणीचा विषय आहे. मी काही चूक म्हणालो नाही, मात्र मुलगी दोषी नाही... ''
वाचा-हाथरस पीडितेची खरंच तुम्हाला चिंता? कदमांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या VIDEO
या भाजप नेत्यानं सीबीआय तपास आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना तुरूंगातून तात्काळ मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. तसेच ते म्हणाले की, "मी जे काय सांगितले त्याचा तपास झाला तर ही मुले निर्दोष असल्याचे दिसून येईल हे दाव्यासह सांगतो".
He is not fit to be called leader of any party. He is showing his primitive and sick mindset and I am going to send notice to him. https://t.co/TyWigJwXWM
— Rekha Sharma (@sharmarekha) October 6, 2020
वाचा-हाथरस प्रकरणानंतर आलेल्या UNच्या वक्तव्यावर भारताचं प्रत्युत्तर
दरम्यान श्रीवास्तव यांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रीय महिला आयोग त्यांना नोटीस पाठविण्यास तयारीत आहे. रणजित बहादूर यांच्या आक्षेपार्ह विधानावर आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट केले की ते कोणत्याही पक्षाचे नेते होण्यास ते त्यांची आजारी मानसिकता दर्शवित आहेत. मी त्यांना नोटीस पाठवणार आहे.
वाचा-Hathras: मुख्य आरोपी आणि पीडितेच्या भावामध्ये झालं 5 तास संभाषण, खळबळजनक खुलासा
भाजप नेते रणजित बहादूर अनेकदा वादग्रस्त विधानांबद्दल चर्चेत असतात. ते स्वत: ला आंतरराष्ट्रीय डॉन बबलू श्रीवास्तवचे गुरु मानतात. त्यांच्यावर बाराबंकी, सीतापूर, लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्ये 44 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर रणजित यांच्यावर बाराबंकी नगर कोतवालीमध्येही गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gang Rape, Up crime news