मराठी बातम्या /बातम्या /देश /Hathras: मुख्य आरोपी आणि पीडितेच्या भावामध्ये झालं 5 तास संभाषण, CDR मध्ये खळबळजनक खुलासा

Hathras: मुख्य आरोपी आणि पीडितेच्या भावामध्ये झालं 5 तास संभाषण, CDR मध्ये खळबळजनक खुलासा

या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. हे प्रकरण असाधारण असून राज्य सरकारने साक्षीदारांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

लखनऊ 06 ऑक्टोबर: हाथरस अत्याचार प्रकरणात दररोज नवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणी मंगळवारी आणखी एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. पीडित तरूणी आणि मुख्य आरोपी संदीप याची जुनी ओळख होती आणि दोघांचं बोलणंही होत असे अशी माहिती उघड झाली आहे. मुख्य आरोपी आणि तरूणीच्या भावांमधल्या संभाषणाची माहिती बाहेर आली असून दोघांमध्ये ऑक्टोबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत तब्बल 5 तास बोलणं झालं असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. हे प्रकरण असाधारण असून राज्य सरकारने साक्षीदारांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

या प्रकरणात आता सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पीडित कुटुंबीयांना वकील पाहिजे असल्याच त्याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. अशातच भाजपचे एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक आणि संतापजनक विधान भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे.

उघड्या गटारीचा बळी! घाटकोपरला गायब झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला हाजीअलीला

सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार आहे. हाथरस प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुक्तफळं उधळली.

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा गोंधळ, Online परीक्षा देता न आल्याने संताप

घटनेनंतर पोलिसांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले त्यावरून राज्य सरकारवर प्रचंड टीका झाली होती. पीडित मुलीचं पार्थिव कुटुंबीयांना न देता परस्पर अंत्यसंस्कार पोलिसांनी केले होते. त्यावरून प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

First published:
top videos

    Tags: Uttar pradesh