मुंबई, 07 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस पक्षाकडून या घटनेच्या निषेधार्थ देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. परंतु, वसईत निषेध करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला. भाजपचे नेते रामदास कदम यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हाथरस घटनेच्या निषेध करण्यासाठी वसईमध्ये स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. मात्र, काही कारणावरून कार्यकर्त्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राम कदम यांनी हा व्हिडीओ शेअर करून थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सवाल विचारला आहे.
#Cong factions clash at protest site which exposes their true motive.Any incident of rape is condemnable but these internal fights of Cong workers in Vasai raises a pertinent question. Do they really feel for the victim in #Hathras or more concerned about publicity? @RahulGandhi pic.twitter.com/Dt591Dyab4
— Ram Kadam (@ramkadam) October 7, 2020
‘हाथरस प्रकरणावरून काँग्रेसचे नेते आंदोलनं करत आहे. पण त्यांचा खरा हेतू आता समोर आला आहे. बलात्काराची घटना ही निंदनिय आहे. पण वसईमध्ये हाथरस प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे, असं म्हणत राम कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसंच, ‘हाथरस पीडितेबद्दल तुम्हाला खरंच काही वाटत आहे की फक्त प्रसिद्धीसाठीच असे स्टंट केले जात आहे’, अशा थेट सवालही राम कदम यांनी काँग्रेसला विचारला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? वसई तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी काँग्रेसच्या वतीने हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आंदोलनासाठी जमा झाले होते. योगी आदित्यनाथ सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयासमोर पोहोचले. या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला सुद्धा सहभागी होत्या. आता ‘मुळशी पॅटर्न’ बस्स! नागरिकांच्या हातात बंदुकी देण्याचा पोलिसांचा फैसला तहसीलदार कार्यालयाजवळ पोहोचल्यावर कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना पुढे येण्यास सांगितले. तेव्हा बॅनर खाली खेचल्यावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. जिल्हा सरचिटणीस रामदास वाघमारे आणि चिटणीस मकसूद मणियार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काही वेळातच दोघांमध्ये सुरू असलेल्या बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. पदाधिकारी एकमेकांना मारताना पाहून त्यांच्या समर्थकांनी यात उडी घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच राडा घातला. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा तिढा अखेर सुटला, नावांवर आज मंजुरीची शक्यता विशेष म्हणजे, काँग्रेसचे वसई विरार शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्यासमोरच ही हाणामारी झाली. यावेळी पदाधिकारी आणि नेत्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही मारहाण सुरूच होता.अखेर पोलिसांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना बाजूला केले त्यानंतर वाद निवळला.