• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • ...तर मोठी किंमत चुकवावी लागेल, शिवसेना खासदारांचा थेट मोदी सरकारला इशारा

...तर मोठी किंमत चुकवावी लागेल, शिवसेना खासदारांचा थेट मोदी सरकारला इशारा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक संस्था मुंबईत आहेत.

  • Share this:
मुंबई, 2 मे: केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून 'आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र ( IFSC) गांधींनगर (गुजरात) येथे हलवण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे. IFSC मुंबईबाहेर गेल्यास, मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. केंद्र सरकारला या अन्यायकारक निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं आव्हानही खासदार राहुल शेवाळे यांनी दिलं आहे. हेही वाचा.. मुंबई-पुण्यातून गावी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक संस्था मुंबईत आहेत. त्यामुळे जगभरातील आर्थिक घडामोडींशी ताळमेळ साधणारे, 'आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र' मुंबईतच असावे, असा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC)जागाही निश्चित करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने ही जागा मेट्रो रेल्वेसाठी आरक्षित करून IFSC मुंबईत उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिकूल परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप यापूर्वी खासदार शेवाळे यांनी लोकसभेत केला होता. हेही वाचा..लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी खात्यांमध्ये पाठवले पैसे,वाचा कशी काढाल रक्कम दरवर्षी मुंबईतून केंद्राला सुमारे पावणे दोन लाख कोटींचा कर दिला जातो. तसेच देशभरातील 90 टक्के व्यापारी बँकिंग, 80 टक्के म्युच्युअल फंड ची नोंदणी मुंबईतुन होते. या सर्व बाबींचा विचार करता, आयएफएससी मुंबईबाहेर नेल्यास, केंद्र सरकारला या अन्यायकारक निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे. दरवर्षी एकट्या मुंबईकडून केंद्राकडे जमा होणारा सुमारे 40 टक्के कर, गांधीनगर इथूनच वसूल करावा, असा सल्लाही खासदार शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र दिनी मुंबईतील बीकेसीमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC)गुजरातमधील गांधीनगरला हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता त्यावरुन महाविकास आघाडीविरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यात IFSC मुंबईबाहेर गेल्यास मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल, असा इशारा खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published: