लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी खात्यांमध्ये पाठवले पैसे, जाणून घ्या कशी काढू शकाल ही रक्कम

लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी खात्यांमध्ये पाठवले पैसे, जाणून घ्या कशी काढू शकाल ही रक्कम

केंद्र सरकार गरीब परिवारातील महिलांच्या जनधन खात्यामध्ये (Jan Dhan Account) 3 महिन्यासाठी दर महिना 500 रुपये ट्रान्सफर करत आहे. सध्या या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता पाठवण्याचे काम सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मे : कोरोनाच्या (Coronavirus Pandemic) या संकटातून देशाला वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 3 मेनंतर 17 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त नुकसान गरीब परिवारांचे झाले आहे. या नागरिकांची मदत करण्यासाठी सरकार गरीब परिवारातील महिलांच्या जनधन खात्यामध्ये (Jan Dhan Account) 3 महिन्यासाठी दर महिना 500 रुपये ट्रान्सफर करणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारा दुसरा हप्ता ट्रान्सफर करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये याकरता टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

मे महिन्याचा मिळणारा हप्ता कसा काढण्यात यावा याकरता आर्थिक सेवा विभागाने वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार लाभार्थी त्यांचे पैसे खात्यातून काढू शकतात. गरीब कुटुंबातील महिलांच्या जनधन खात्यामध्ये 11 मेपर्यंत मे महिन्याचा हप्ता पाठवण्याचे काम पूर्ण होणार आहे.

काय आहेत पैसे काढण्यासाठी नियम?

-ज्यांच्या जनधन खात्याचा शेवटचा आकडा 0 आणि 1 आहे त्यांच्या खात्यामध्ये 4 मे रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत.

-ज्यांच्या जनधन खात्याचा शेवटचा आकडा 2 आणि 3 आहे त्यांच्या खात्यामध्ये 5 मे रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत.

-ज्यांच्या जनधन खात्याचा शेवटचा आकडा 4 आणि 5 आहे त्यांच्या खात्यामध्ये 6 मे रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत.

-ज्यांच्या जनधन खात्याचा शेवटचा आकडा 6 आणि 7 आहे त्यांच्या खात्यामध्ये  8 मे रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत.

-ज्यांच्या जनधन खात्याचा शेवटचा आकडा 8 आणि 9 आहे त्यांच्या खात्यामध्ये 11 मे रोजी पैसे टाकण्यात येणार आहेत.

(हे वाचा-छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा,मोदी सरकारच्या आदेशानंतर या बँकेची मोठी मदत)

11 मेनंतर सुद्धा तुम्ही हे पैसे काढू शकता. बँकेमध्ये गर्दी कमी व्हावी याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बँकेत जाऊन पैसे काढण्याव्यतिरिक्त तुम्ही जवळच्या एटीएमध्ये जाऊन किंवा बँक मित्राच्या साहाय्याने देखील पैसे काढू शकता. कोणत्याही एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त शूल्क द्यावे लागणार नाही. यासंदर्भात देखील सरकारने दिशानिर्देश जारी केले आहेत. हे वेळापत्रक केवळ या महिन्याकरता असल्याची माहिती बँकांकडून देण्यात आली आहे.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: May 2, 2020, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading