• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • धक्कादायक! घरात असं काही झालं की जावायाने चक्क सासूचं नाक चावलं, चाकूने कान कापला

धक्कादायक! घरात असं काही झालं की जावायाने चक्क सासूचं नाक चावलं, चाकूने कान कापला

फक्त नाक चावून तो थांबला नाही तर त्याने रागाच्या भराता चाकून सासूचा कान कापला. चावल्यामुळे आणि कान कापल्यामुळे सासू गंभीर जखमी झाली होती.

 • Share this:
  बिहार, 26 ऑगस्ट : आता सासू आणि जावई म्हटलं की मानपानाच्या गोष्टी आल्याच. पण सासूवर राग आल्यानं त्यांचं चक्क नाक जावयाने चावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जावईने रागात आपल्या सासूचं नाक चावलं तर चाकूने कानाचा एक भाग कापला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तिला प्लास्टिक शस्त्रक्रियेसाठी लखनऊ इथल्या रुग्णालायत दाखल करण्यात आलं . या घटनेनंतर सासऱ्यांना जावायासह त्याच्या कुटुंबातील सहा जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात राहणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबाने त्यांच्या मुलीचा विवाह गावात राहणाऱ्या एका तरुणाशी लावून दिला. 31 ऑगस्टला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे मुलीला भेटण्यासाठी सगळं कुटुंब तिच्या सासरी गेलं. पण काही शुल्लक कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. वाद इतका वाढत गेला त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली. ज्यामध्ये रागात जावायाने सासूचं नाक चावलं आणि तिला जखमी केलं. इतर बातम्या - या कारणांमुळे शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी फक्त नाक चावून तो थांबला नाही तर त्याने रागाच्या भराता चाकून सासूचा कान कापला. चावल्यामुळे आणि कान कापल्यामुळे सासू गंभीर जखमी झाली होती. अखेर खूप रक्तबंबाळ झाल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातपूरते उपचार केल्यानंतर प्लास्टिक शस्त्रक्रियेसाठी त्यांना लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर बातम्या - नागपुरात 'होम ट्युशन'मध्ये शिक्षकाचे दोन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे या सगळ्या प्रकरणामध्ये सासऱ्यालाही बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या बंदूक रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. या सगळ्या घटनेनंतर मुलीचे सासरकडचे लोक फरार आहेत. मुलीच्या वडिलांकडून पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलीस या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत. तर आरोपींचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे. VIDEO: निवडणुकीवरून भररस्त्यात मुलींमध्ये तुफान राडा
  Published by:Renuka Dhaybar
  First published: