झारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद

झारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद

झारखंडमधील नक्षलप्रभावित लतेहरमध्ये माओवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 पोलीस शहीद झालेत.

  • Share this:

झारखंड, 27 जून : झारखंडमधील नक्षलप्रभावित लतेहरमध्ये माओवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 पोलीस शहीद झालेत. तर 5 पोलीस जखमी आहेत. झारखंडच्या लतेहरमध्ये काला पहाड भागात काल संध्याकाळी ही चकमक झाली.

या हल्ल्यात झारखंड जॅग्वार या विशेष पथकाचे 6 जवान शहीद झाले. लतेहर आणि गढवाचे एसपीही यावेळी उपस्थित होते. सुत्रांच्या माहितीनुसार, शोधकार्यासाठी निघालेल्या पोलीस संघटनांवर निशाणा साधत नक्षलवाद्यांकडून पहिले लँडमाइन ब्लास्ट करण्यात आला आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

हेही वाचा...

पंतप्रधान दहशतवाद्यांचं सर्वात मोठं टार्गेट,गृहमंत्रालयाचा पु्न्हा अलर्ट

त्यानंतर जवानांनी त्यांना उत्तर देण्यास सुरूवात केली आणि नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला. या नक्षलवाद्यांनी पोलीसांची हत्यार चोरली असल्याचीही माहिती समोर येत आहे.

नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात लतेहार आणि गढवा जिल्ह्यातले एसपी देखील होते. पण ते सुरक्षित असल्याची माहिती आहे. गढवा पोलीस उपमहानिरिक्षक विपुल शुक्ला यांनी सांगितलं की, सुरक्षित जवानांना आता जंगली रस्त्याने बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

हेही वाचा...

भाजपच्या नगरसेवकाची आळंदीत भरदिवसा हत्या

क्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी

VIDEO : वडाळ्याच्या भूस्खलनाचा थरार!

आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी

First published: June 27, 2018, 7:24 AM IST

ताज्या बातम्या