VIDEO अॅक्टिव्हाला भरधाव वेगातल्या चारचाकीची धडक, एकाचा मृत्यू

VIDEO अॅक्टिव्हाला भरधाव वेगातल्या चारचाकीची धडक, एकाचा मृत्यू

मुंबईच्या उल्हासनगरमध्ये एक भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जून : मुंबईच्या उल्हासनगरमध्ये एक भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या १७ सेक्शन येथून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर रविवारी रात्री हा अपघात झाला.

भरधाव वेगात असलेल्या एका चारचाकी वाहनाने समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या १७ सेक्शन येथून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावरील रविवारी रात्री हा अपघात झाला.

या अपघातात चारचाकी गाडीतील प्रशांत ठाणगे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान हा अपघात एका दुकानावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. प्रशांत आणि त्याचा मित्र बदलापूरहून रविवारी रात्रीच्या सुमारास कल्याणच्या दिशेने आपल्या कारने येत असताना मुसळधार पाऊस सुरु होता.

आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी

त्यावेळी कार उल्हासनगरामधील १७ सेक्शन परिसरात हॉटेल नीलम समोर भरधाव वेगाने रात्री साडे अकरा वाजल्याच्या सुमारास आली असता.

त्याच सुमाराला कारच्या समोर अचानक दुचाकी आली. या दुचाकीवरील व्यक्तीला वाचविण्यासाठी चालकाने प्रयत्न केला. मात्र मुसळधार पावसामुळे चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जावून जोरदार आदळून भीषण अपघात झाला.

या अपघात प्रशांत ठाणगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे मित्र व चालक गंभीर जखमी झाले. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चालक निखिल कुंभार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा...

वडाळ्यात इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळल्यामुळे दोस्ती बिल्डर्सच्या विरोधात गुन्हा दाखल

आणीबाणीवरून राजकारण तापलं ! देशात ४ वर्षांपासून अघोषित आणीबाणी, मनसेची टीका

कोल्हापूरात कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक, 2 जण ठार 26 जखमी

First published: June 26, 2018, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading